डोंबिवली : विद्या विकास मंडळ डोंबिवली,आणि वात्सल्य ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत विद्यार्थ्यांसाठी तसेच नोकरी लागण्यासाठी उपयुक्त असे सेंट्रल गव्हर्मेंट सर्टिफाइड १२ पेक्षा अधिक काँम्प्यूटर कोर्स एकदम अत्यल्प फि मध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत. डोंबिवलीतील गरजू विद्यार्थी आणि नोकरी शोधणाऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन विद्या विकास मंडळ डोंबिवली तर्फे स्वानंद चक्रदेव यांनी केले आहे. तसेचअधिक माहितीसाठी ९७०२६००००१ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.