सर्वसामान्यांच्या कार स्वप्नपूर्तीला कल्याण जनता सह. बॅकेचे बळ; फडके मैदानात कार महोत्सवाला सुरुवात

28 Sep 2025 12:44:19

कल्याण : सर्वसामान्यांच्या कार खरेदीच्या स्वप्नाला बळ देण्याचे काम दि कल्याण जनता सहकारी बॅकेने कार महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. या कार महोत्सवामुळे एकाच छताखाली सर्व प्रकारच्या कार उपलब्ध होणार आहेत. त्यातच शून्य प्रक्रिया शुल्क, कार किमतीच्या अगदी कमी मार्जिन ने कर्ज पुरवठा यासारख्या सुविधांमुळे कार खरेदी इच्छुकांचा यंदाचा दसरा गोड होणार आहे.

दि कल्याण जनता सहकारी बॅकेतर्फे कल्याण पश्चिमेतील आधारवाडी येथील फडके मैदान येथे दोन दिवसीय कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे शनिवारी सकाळी उद्योजक गौतम दिवाडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दि. २७ ते २८ सप्टेंबर या दोन दिवसात हा महोत्सव सुरू राहणार आहे. या महोत्सवात कार लोनवर आकर्षक व्याजदर, शून्य प्रक्रिया शुल्क आणि जवळपास कार किंमतीच्या रकमेच्या अगदी कमी फरकाने कर्ज वाटपाची सुविधा दिली आहे. यावेळी बँकेचे अध्यक्ष यशवंत पांगारकर, संचालक डॉ. रत्नाकर पाठक, सुरेश पटवर्धन, शशिकांत आंधळे, माजी संचालक मोहन आधारकर , बँकेचे महाव्यवस्थापक मिलिंद फाटक आदी मान्यवर उपस्थित होते.

यशवंत पांगारकर म्हणाले, केंद्र सरकारने ऑटोमोबाईल इंड्रस्टीत जीएसटी कमी करून एक चांगला निर्णय घेतला आहे. स्कूटरवरील डय़ूटी दहा टक्क्यांनी कमी झाली आहे. १५०० सीसी इंजिन क्षमते पर्यंतच्या कारवरील डय़ूटी कमी केली आहे. लॅक्झरीज कार वरील सेस कमी करण्यात आला आहे. ऑटोमोबाईल खरेदी आता खूप आकर्षक झाली आहे. त्यामुळे कार खरेदी इच्छुक या मेळाव्याला चांगला प्रतिसाद देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गौतम दिवाडकर यांनी सांगितले, कल्याण जनता सहकारी बॅकेशी माझे खूप जुने आणि जिव्हाळ्य़ाचे नाते आहे. मी जेव्हा डेव्हलपमेंटसाठी कर्ज काढण्याचा विचार केला त्यावेळी मला कोणत्याही बॅकेने कर्ज उपलब्ध करून दिले नव्हते. या कठीण प्रसंगात मला कल्याण जनता बॅकेने मदतीचा हात दिला. त्यामुळे व्यवसायात वृध्दी करता आली असे त्यांनी सांगितले.

उद्घाटन समारंभ सुरू असताना कार बुकिंग केलेल्या सचिन घुडे आणि ज्ञानप्रकाश पांडे यांना कार ची प्रतिकात्मक चावी आणि बँकेचे कर्ज मंजुरीचे पत्र देण्यात आले.


Powered By Sangraha 9.0