वर्षाअखेरीस प्रदर्शनासाठी सज्ज बहुप्रतीक्षित चित्रपट

    27-Sep-2025
Total Views |

२०२५ हे इंग्रजी वर्ष संपायला आता अवघे तीन महिने. पण, या आगामी तीन महिन्यांत काही बहुप्रतीक्षित मराठी आणि हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशाच काही चित्रपटांची थोडक्यात माहिती...

कांतारा चॅप्टर १ (ॲक्शन/थ्रिलर)
प्रदर्शन दिनांक : २ ऑक्टोबर
दिग्दर्शक: ऋषभ शेट्टी
छायांकन : अरविंद कश्यप
कार्यकारी निर्माता: आदर्श जे.ए
भाषा : हिंदी, कन्नड, तेलुगू

वडापाव (फॅमिली ड्रामा)
प्रदर्शन दिनांक : २ ऑक्टोबर
दिग्दर्शक : प्रसाद ओक
कलाकार : प्रसाद ओक, गौरी नलावडे, अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर, सिद्धार्थ साळवी, शाल्व किंजवडेकर, अश्विनी किन्हीकर, सविता प्रभुणे
भाषा : मराठी

मनाचे लोक (प्रेमकथा)
प्रदर्शन दिनांक : १० ऑक्टोबर
लेखक, दिग्दर्शक : मृण्मयी देशपांडे
सादरकर्ते : नितीन वैद्य
कलाकार: मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे, करण परब, उदय टिकेकर, शुभांगी गोखले, मंगेश कदम, लीना भागवत, मल्हार लिमये
संगीत दिग्दर्शक: सिद्धार्थ महादेवन, सौमिल शृंगारपुरे
भाषा : मराठी

एक दिवाने की दिवानीयत (प्रेमकथा)
प्रदर्शन दिनांक : २१ ऑक्टोबर
दिग्दर्शक : मिलाप झवेरी
कलाकार : हर्षवर्धन राणे, सोनम बाजवा, शाद रंधवा
भाषा : हिंदी

‌‘प्रेमाची गोष्ट २’ (प्रेमकथा)
प्रदर्शन दिनांक : २२ ऑक्टोबर
दिग्दर्शक : सतीश राजवाडे
निर्माता : संजय छाब्रिया
पटकथा आणि संवाद : अभिजित गुरु
कलाकार : ललित प्रभाकर, रुचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्नील जोशी, भाऊ कदम, अविनाश नारकर
भाषा : मराठी

‌‘अभंग तुकाराम‌’ (चरित्रात्मक)
प्रदर्शन दिनांक : ७ नोव्हेंबर
कथा आणि संवाद : योगेश सोमण
पटकथा आणि दिग्दर्शन : दिग्पाल लांजेकर
निर्माते : कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक
सह-निर्माते: (पॅनोरमा स्टुडिओ) मुरलीधर छटवानी आणि रवींद्र औटी
कलाकार : समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकण, अजय पुरकर, योगेश सोमण, स्मिता शेवाळे, निखिल राऊत, सचिन भिलारे, अभिजीत श्वेचंद्र, विराजस कुलकण, अजिंक्य राऊत, नुपूर दैठणकर, अवधूत गांधी, सुनील सुर्वे, जोशी, जोवरी गोडबोले, शरवरी बाशकर, तेजोपिन ए. रुद्र कोळेकर, इश्मिता जोशी, अभिर गोरे
भाषा : मराठी

स्मार्ट सुनबाई (फॅमिली ड्रामा)
दिग्दर्शन : शिवाजी दोलताडे
कथा आणि लेखन : योगेश शिरसाट
निर्माते : गोवर्धन दोलताडे, गाग
कलाकार : रोहन पाटील, संतोष जुवेकर, भाऊ कदम, मोहन जोशी, दीपक शिर्के, अंशुमन विचारे, विनम्र बाबल, सायली देवधर, प्राजक्ता गायकवाड, प्राजक्ता हनमगर, स्नेहल शिदम, किशोरी शहाणे, उषा नाईक, भक्ती चव्हाण, दीप्ती सोनवणे, अनुष्का बेनके, पूजा राजपूत, सुचिका जोशी, विद्या मेहेत्रे, आर्या सकुंडे , वैशाली चौधरी , सपना पवार , कांचन चौधरी
भाषा : मराठी

धुरंधर (थरारपट)
प्रदर्शन दिनांक : ५ डिसेंबर
दिग्दर्शक : आदित्य धार
छायांकन : विकास नौलखा
कलाकार : रणवीर सिंग, संजय दत्त, आर माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल
भाषा : हिंदी