नवरात्री दरम्यानच हिंदू देवी-देवतांचा अपमान

    27-Sep-2025
Total Views |

मुंबई : राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील डबोक परिसरात नवरात्रीच्या काळातच काही अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळी घरांबाहेर व दुकानदारांच्या परिसरात अपमानास्पद पत्रके टाकली आहेत. या पत्रकांमध्ये मूर्तीपूजेचा विरोध करत हिंदू देवी-देवतांवरील श्रद्धेला हानी पोहोचवणाऱ्या मजकुराचा समावेश आहे. पत्रकावर “ख्रिश्चियन कल्चरल सेंटर जलपाईगुड़ी” असे नाव आणि क्रॉस चिन्ह असल्याने स्थानिकांमध्ये संताप पसरला.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी डबोक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून दोषींविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केल. विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की, “कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेवर घाव पोहोचवणाऱ्या अशा वागण्याला कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही. दोषींवर कारवाई होत नसल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल.”

पोलीस प्रशासनाने हा प्रकरण गांभीर्याने घेतले असून, ही पत्रकं जप्त केली आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. डबोक ठाण्याचे पोलिस निरीक्षक हुकुमसिंह यांनी सांगितले की, दोषींना लवकरच अटक केली जाईल.

ही घटना अशा काळात घडली आहे, जेव्हा राजस्थान विधानसभेत धर्मांतरण विरोधी विधेयक पारित झाले आहे. या प्रकारच्या घटनांमुळे सामाजिक ऐक्याला धोका निर्माण होऊ शकतो. स्थानिक नागरिकांनी, हे प्रकरण त्वरित तपासून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळता येतील.