राजधानीतील साहित्य संमेलनामध्ये साडेतीन कोटींचा खर्च आयोजन संस्था 'सरहद' ची माहिती

27 Sep 2025 21:23:37

मुंबई, नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकूण साडे तीन कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती आयोजन संस्था सरहद या संस्थेकडून देण्यात आली आहे. दिल्लीतील संमेलन मराठी भाषा साहित्य आणि संस्कृतीची कक्षा विस्तारणारी असावी असे प्रयत्न आम्ही संयोजित म्हणून केले असे सुद्धा त्यांनी एका निवेदनातून सांगितले आहे. सदर खर्चामध्ये रेल्वे सहचा प्रवास खर्च प्रत्यक्ष कार्यक्रमांचा खर्च मानधन आणि छपाई जाहिरातीसह इतर खर्च समाविष्ट आहेत. रेल्वेतील जेवण तसेच व्यवस्थांचे खर्च मराठी भाषा मंत्री उदय सामत यांनी उचलले असून दिल्ली मधल्या भोजन व्यवस्थेपैकी अंदाजे 70 टक्के भाग भारती विद्यापीठाने केल्याची माहिती या निवेदनातून संस्थेने दिली. महामंडळाने संस्थेस दोन कोटी सत्तर लाख रुपये दिले असून, सभासद नोंदणी तथा स्टॉल बुकिंग च्या माध्यमातून २३ लाख, ९८,५६८ रुपये जमा झाले आहेत. १ लाख रुपये नागपूरच्या गिरीजी गांधी यांच्या संस्थेकडून संमेलनासाठी आलेले होते ते वगळता संस्थेस संमेलनाच्या निमित्ताने केवळ माननीय स्वागत अध्यक्ष यांच्या विद्या प्रतिष्ठानकडून ३५ लाख रुपये, १५ लक्ष रुपयांचे इतर खर्च अशी देणगी पिढी पाटील यांच्या संस्थेकडून ५० लाख रुपयांची प्रायोजकता मिळाली होती. ( यापैकी ४३ लाख, १०,३४५ रुपये जमा झाले).

महाराष्ट्र शासनाने या संमेलनासाठी प्रथम दोन कोटी आणि अधिक दोन कोटी महामंडळाला संमेलनासाठी दिले. संस्थेकडून जास्तीत जास्त बचत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, यात अनेकांनी ठरल्यापेक्षाही कमी मानधन घेतले, तर दिल्लीतील कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या कंपनीकडून काही चुका झाल्याने त्यांना ठरलेल्या रकमेपेक्षा महामंडळाच्या परवानगीने कमी रक्कम देण्यात आली अशी माहिती सरहदने दिली. सदर खर्चाचा ताळेबंद मा. प्रकाश पागे आणि परा सुरेश मेहता या सनदी लेखापाल यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम टप्प्यात आहे, यातील पुढील कार्यवाही महामंडळ करणार आहे. अशी माहिती सरहदने आपल्या निवेदनातून दिली.


Powered By Sangraha 9.0