केडीएमसीच्या वर्धापन दिनानिमित्ताने दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

26 Sep 2025 19:06:23

कल्याण, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा ४२ वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून ७ व ८ ऑक्टोबर रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण पश्चिम येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामुळे या दोन दिवसात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी नागरिकांना अनुभवता येणार आहे.

केडीएमसीच्या वर्धापन दिन दि.०१ ऑक्टोबर २०२५ रोजी येत आहे. परंतु दि.०२ ऑक्टोबर रोजी विजयादशमी असल्यामुळे दि. ०१ ऑक्टोबर रोजीचा वर्धापन दिन महापालिकेतर्फे मंगळवार, दि.०७ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न होणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

दि.०७ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सत्रात दुपारी ३ वाजता वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न होणार आहे. या दिवशी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्गातर्फे मुख्य लेखा परिक्षक सुरेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दि.०१ ऑक्टोबर रोजी जेष्ठ नागरीक दिनही साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून दि.०८ ऑक्टोबर रोजी जेष्ठ नागरीकांनीच, जेष्ठ नागरीकांसाठी तयार केलेल्या मनोवेधक सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले जाणार आहे. तसेच जेष्ठ नागरीकांसाठी हास्यकवी संमेलनाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.


Powered By Sangraha 9.0