मोठी बातमी! लेह हिंसाचारप्रकरणी सोनम वांगचुक यांना अटक

26 Sep 2025 16:13:52


लेह : (Sonam Wangchuk Arrested) लडाखच्या लेह जिल्ह्यात बुधवारी २४ सप्टेंबरला झालेल्या हिंसाचारप्रकरणी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सोनम वांगचुक यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यांच्यावर प्रक्षोभक विधाने करून जमावाला भडकवल्याचा आरोप ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनात, केंद्रीय गृह मंत्रालयाने लडाखमधील हिंसाचारासाठी सोनम वांगचुक जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर गृह मंत्रालयाने वांगचुक यांच्या 'स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख' या एनजीओचा परकीय निधी (एफसीआरए) स्वीकारण्याचा परवाना केंद्र सरकारने रद्द केला आहे.

लडाखला केंद्रशासित प्रदेशाऐवजी राज्याचा दर्जा मिळावा आणि सहाव्या अनुसूचीत समावेश करावा, या मागणीसाठी काही दिवसांपासून लडाखमधील आंदोलकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला बुधवारी २४ सप्टेंबरला हिंसक वळण लागले. ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आणि ७० हून अधिक जण जखमी झाले.




Powered By Sangraha 9.0