भारत आणि अमेरिका यांच्यातील वाटाघाटी अंतिम टप्प्यात : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

    26-Sep-2025
Total Views |


मुंबई : भारत आणि अमेरिका यांच्यातील वाटाघाटी अंतिम टप्प्यात असून एका आठवड्यात गोष्टी स्पष्ट होतील, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी मुंबईत फायनान्शियल एक्सप्रेसने आयोजित केलेल्या इंडिया'ज बेस्ट बँक्स अवॉर्ड्स वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "भारत आणि अमेरिका यांच्यातील वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. अर्थव्यवस्था सुरळीत चालत राहील याची खात्री केंद्र सरकार करेल. एका आठवड्यात गोष्टी स्पष्ट होतील. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यात भारतातील तरुणांची भूमिका महत्त्वाची असेल," असेही ते म्हणाले.