डोनाल्ड ट्रम्प यांचं धक्कातंत्र सुरुच! १ ऑक्टोबरपासून औषधांवर १०० टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

26 Sep 2025 13:25:22

Donald Trump
 
वॉशिंग्टन, डी.सी.: (Donald Trump's 100% Pharma Tariff) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात केलेल्या ब्रँडेड किंवा पेटंट केलेल्या औषधांवर १०० टक्के टॅरिफ लादण्याची नवी घोषणा केली आहे. हा कर १ ऑक्टोबरपासून लागू होणार असल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. ट्रम्प यांनी गुरुवारी २६ सप्टेंबर रोजी ट्रुथ या सोशल मीडिया वेबसाईट वर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली.
 
यावेळी त्यांनी औषधांबरोबरच अवजड ट्रकवर २५ टक्के आणि स्वयंपाकघरातील कॅबिनेटवर ५० टक्के टॅरिफ लादणार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, '"जोपर्यंत औषध कंपनी त्यांचे उत्पादन अमेरिकेत घेत नाही, तोपर्यंत आम्ही आयात केलेल्या प्रत्येक ब्रँडेड किंवा पेटंट केल्या औषधांवर १०० टक्के टॅरिफ लादणार आहोत. १ ऑक्टोबर २०२५ पासून याची सुरुवात होईल. मात्र अमेरिकेत तयार होणाऱ्या औषधांना यातून सूट मिळेल."
 
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, "पुढील आठवड्यापासून आम्ही सगळ्या किचन कॅबिनेट्स, बाथरूम व्हॅनिटीजवर ५० टक्के आणि अपहोल्स्टर्ड फर्निचरवर ३० टक्के कर आकारण्यास सुरुवात करणार आहेत. सर्व नवीन कर १ ऑक्टोबरपासून लागू होतील."


Powered By Sangraha 9.0