मुंबई (विशेष प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील कुर्णे येथील राखीव वनक्षेत्रामधून साग कापून त्याची तस्करी केल्याप्रकरणी वन विभागाने बुधवारी दि. २४ सप्टेंबर रोजी सात आरोपींना अटक केली (ratnagiri reserve forest). या आरोपींनी कुर्णे येथील साग कापून ते राजापूर तालुक्यातील माडबन येथे लपवून ठेवले होते (ratnagiri reserve forest). त्यांच्याकडून तीन लाख रुपयांहून अधिक किंमतीचा माल जप्त करण्यात आला. (ratnagiri reserve forest)
रत्नागिरी वन विभागातील लांजा वनपरिक्षेत्राचे वनपाल आणि वनरक्षक हे ३० आॅगस्ट रोजी कुर्णे गावातील राखीव वनक्षेत्रात गस्तीकरिता गेले होते. त्यावेळी त्यांना त्याठिकाणी वनक्षेत्रातील सात सागाची झाडे तोडलेली दिसली. ही तोड अवैद्य चोरतूट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यातील काही चोरतूट माल हा जागेवर होता आणि काही माल इतरत्र हलविल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार वनरक्षक लांजा यांनी गुन्हा नोंदवला. या गुन्ह्याच्या तपासामध्ये २४ सप्टेंबर रोजी कुंभवडे गावातील सात रहिवाशांवर आरोपीचा ठपका ठेवून अटक करण्यात आली. मनोज संजय पाटणकर, मंदार संजय पाटणकर, अजय नागूप्रसाद निषाद, शत्रूघ्न दत्ताराम गोठणकर, विजयकुमार रामशंकर निषाद, मंदार मनमोहन बारस्कर, शुभम रवींद्र गुरव यांना अटक करण्यात आले आहे.
या गुन्ह्यामधील मुद्देमालाची क्रेन यंत्राने ट्रकमध्ये भरून रातोरात कुर्णे ते कुंभवडे अशी वाहतूक करण्यात आली. त्यानंतर तेथे उतरवून तो मुद्देमाल परत क्रेन यंत्राने दुसऱ्या ट्रकमध्ये भरून माडबनपासून साधारण ४०० मी अंतरावर स्थानिक नाव पठार येथे लपवून ठेवण्यात आला. वनकर्मचाऱ्यांनी जागेवरु जाऊन एकूण साग नग (३१/७.४९५ घमी.) मुद्देमाल जप्त केला. बाजार भावानुसार याची अंदाजे किंमत ३ लाख १४ हजार ७९० इतकी होती. साग माल हा वनरक्षक लांजा यांच्याकडे सुरक्षेच्या कारणास्तव ताबा पावतीने ताब्यात देण्यात आलेला आहे. लांजा येथे क्रेन क्रमांक MH09GM0452 जप्त केली असून पुढील तपास चालू आहे. तसेच सदर वन गुन्ह्यामध्ये समाविष्ट असणारी वाहने व इतर साधन सामग्री इत्यादी बाबींचा तपास चालू आहे.