कल्याण : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त महानगरपालिका मुख्यालयात तळ मजल्यावर अतिरीक्त आयुक्त विठ्ठल डाके यांच्या शुभहस्ते पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकान्वये आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अनमोल सागर (भा.प्र.से) यांचे निर्देशानुसार दि. २५ सप्टेंबर रोजी महानगरपालिका मुख्यालयात तळ मजल्यावर पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांचे प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी रामप्रसाद सोळुंके , सहाय्यक आयुक्त ( आरोग्य ) शैलेश दोंदे, मिलिंद पळसुले, राजेश गोसावी, सुधीर गुरव, विनोद मनोरे आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.