मेट्रो ९चाचणी दरम्यान अचानक मेट्रो ७च्या ट्रॅकवर ?: चाचणी दरम्यान तांत्रिक बिघाड ;एमएमएमओसीएलची माहिती

25 Sep 2025 15:13:17

मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी मुंबई मेट्रो मेट्रो 2A आणि 7 या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. बुधवार,दि.२४ रोजी सकाळी तब्बल तीन तासांपासून मेट्रो विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. काही ठिकाणी मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याने प्रवाशांना इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. सकाळच्या वेळी हा बिघाड झाल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे.

मुंबई मेट्रो लाईन ९वर सध्या चाचणी फेऱ्या सुरु आहे. या चाचणीदरम्यान जेव्हा मेट्रो ९वरून धावणारी गाडी मेट्रो मार्गिका ७ कडे वळत होती, तेव्हा दहिसर (पूर्व) येथील पॉईंट सेक्शन जवळ किरकोळ तांत्रिक अडचण निर्माण झाली, असल्याची माहिती मुंबई मेट्रो ऑपरेशन कोर्पोरेशने दिली आहे. मात्र चाचणीदरम्यान मेट्रो ९ ही अचानक मेट्रो ७च्या ट्रॅकवर आल्याचे कळते आहे. ही घटना होताच गाडी ट्रॅकवर वेळासाठी थांबली. परंतु प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व स्थानकांवर सेवा तत्काळ व्यवस्थितपणे चालवण्यात आली आणि त्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आली, असल्याचे एमएमएमओसीएलने सांगितले.

एमएमएमओसीएलने दिलेल्या माहितीनुसार, सेवा अखंडित राखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. आरे - ओव्हारीपाडा या दरम्यान लूप ऑपरेशन सुरू करण्यात आले. एकाच ट्रॅकवर दोन्ही दिशेने मेट्रो सेवा चालवली गेली. मात्र दोन सेवा दरम्यान काहीसा विलंब झाला. याकाळात गुंदवली-आरे (दोन्ही दिशेने ) शॉर्ट लूप सेवा सुरू ठेवण्यात आली. विशेष म्हणजे अंधेरी पश्चिम- दहिसर पश्चिम दरम्यानच्या सर्व स्टेशनसह लाईन २ अ वरील सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होत्या. आमचा तांत्रिक सुरक्षा कार्य पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि अल्पावधीत तांत्रिक अडचण दूर करण्यात आली.

प्रवाशांवर परिणाम

या बदलांचा सर्वाधिक फटका गुंदवली, आरे आणि ओव्हरीपाडा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला. काही गाड्यांचे वेळापत्रक बदलल्याने किंवा प्रतीक्षा वेळ वाढल्याने प्रवासात विलंब.


Powered By Sangraha 9.0