हिंदूंच्या सणांतील भेसळ थांबवा!

24 Sep 2025 22:48:50

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत इंडोनेशियाच्या अध्यक्षांनी आपल्या भाषणाचा शेवट ‘ओम शांती ओम’ या मंत्राने केला. भारतातील मुस्लिमांना ‘भारतमाता की जय’ म्हणण्याचेही वावडे आहे. भारतीय मुस्लिमांचे लाड हिंदूच चालवून घेतात. हिंदूंच्या धार्मिक सणांमध्ये होणारा अन्य धर्मीयांचा होणारा हा हस्तक्षेप थांबविण्याची वेळ आता आली आहे.

दसरा हा म्हैसूरमधील सर्वांत मोठा सण. त्याचा प्रारंभ घटस्थापनेपासूनच होतो. वोडीयार या म्हैसूरच्या राजघराण्याची चामुंडादेवी ही आराध्य देवता असून, तिच्या पूजनाने आणि अनुष्ठानाने घटस्थापनेपासून या उत्सवास प्रारंभ होतो. यंदा या उत्सवाच्या प्रारंभाच्या सोहळ्याचे उद्घाटन आणि अनुष्ठान, बानू मुश्ताक या मुस्लीम लेखिकेच्या हस्ते करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला होता. त्यास काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला. त्यांनी त्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयातही दाद मागितली पण, त्या न्यायालयानेही हा सरकारी कार्यक्रम असल्याचे सांगून तक्रारीकडे दुर्लक्ष केले.

दसरा हा सण सरकारी कार्यक्रम कसा असू शकतो? भारतात एकच सण विविध राज्यांत स्थानिक परंपरेनुसार साजरा केला जातो. गुढीपाडव्याला गुढ्या उभारण्याची प्रथा महाराष्ट्रात आणि काही प्रमाणात मध्य प्रदेशात आहे. अन्य राज्यांमध्ये गुढी उभारली जात नाही; पण गुढीपाडवा साजरा केला जातो. त्याचप्रमाणे दसरा सण भारतात सर्वत्र साजरा केला जात असला, तरी म्हैसूरमध्ये तो विशेष उत्साहात आणि डामडौलात साजरा केला जातो. या धार्मिक सणाचा प्रारंभ हिंदू देवता आणि मूर्ती यांना न मानणार्या, किंबहुना त्याचा विरोध करणार्या एका मुस्लीम व्यक्तीच्या हस्ते करण्याचे कारण काय? ही घटना कर्नाटकात काँग्रेस सरकार असल्यामुळेच घडली. काँग्रेसला तर हिंदू या शब्दाचीही अॅलर्जी आहे. त्यामुळेच हिंदू सण, देवता आणि प्रथा-परंपरा यांचा अपमान करण्यास काँग्रेसचे नेते नेहमीच आघाडीवर असतात.

बानू मुश्ताक यांच्या हस्ते या सणाचे उद्घाटन होत असताना तेथे उपस्थित असलेल्या एकाही हिंदू पुजार्याच्या, साधू-संतांच्या चेहर्यावर किंचितही नापसंतीची आठी उमटली नव्हती. वर हिंदूंनी अधिक सहिष्णुता दाखवावी, असे आवाहनही या मुश्ताकबाईंनी आपल्या भाषणात करून हिंदूंवरच पावशेर ठेवला! मुश्ताकबाईंची स्वतःच्या धर्माच्या धार्मिक सणांमध्ये हिंदू देवतांच्या तसबिरी मिरविण्याची हिंमत आहे का? इतकेच नव्हे, तर त्यांना त्यांच्याच धर्माच्या मशिदीत जाण्याची तरी परवानगी आहे का? ते त्यांनी तपासावे. सहिष्णुतेची खरी गरज त्या समाजालाच आहे.

पण, खरा मुद्दा हिंदू साधू-संत आणि शंकराचार्यांच्या भूमिकेचा आहे. भारतात अनेक साधूंचे आखाडे आहेत, शंकराचार्य आहेत, अनेक धार्मिक संत-बाबा आहेत. कर्नाटकातही हिंदूंच्या विविध पंथांचे शेकडो महंत आणि बाबा आहेत. पण, यापैकी कोणीच या घटनेवर जाहीर आक्षेप का घेतला नाही? हिंदूंच्या धार्मिक सोडाच, होळीसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमातही सहभागी होण्यास मुस्लीम तयार नसतात. यंदा होळीच्या दिवशी ईद हा सण आला, तेव्हा उत्तर प्रदेशात दिवसाच्या पूर्वार्धात हिंदूंनी आणि उत्तरार्धात मुस्लिमांनी हा सण साजरा करण्याचा तोडगा काढावा लागला. इतकी कट्टरता जर मुस्लीम दाखवू शकतात, तर त्यांना दसर्यासारख्या एका महत्त्वाच्या धार्मिक सणात सहभागी करून घेण्याची बळजबरी हिंदू का सहन करीत आहेत?

गेल्या काही वर्षांपासून गुजरातमध्ये नवरात्रात दांडिया आणि गरबा या कार्यक्रमांमध्ये, मुस्लिमांना मज्जाव केला जात आहे. या कार्यक्रमातील स्वैर भेटीचा गैरफायदा घेत, काही मुस्लीम युवक हिंदू तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत असल्याच्या घटना उघड झाल्या होत्या. त्यानंतर तेथील गरबा आणि दांडियात मुस्लिमांना प्रवेश नाकारला जाऊ लागला. यंदा ‘विश्व हिंदू परिषदे’ने याबाबत रीतसर आदेशच जाहीर केला आणि आपले कार्यकर्ते या मंडळांच्या प्रवेशद्वारी उभे केले आहेत. बागेश्वरधामचे महंत पं. धीरेन्द्रकृष्ण शास्त्री यांनीही, या कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांना मनाई करण्याचे जाहीर आवाहन केले आहे. कारण, हिंदूंच्या सणांचे आणि धार्मिक कार्यक्रमांचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी या धर्माचार्यांवरच आहे. ज्याप्रमाणे कुंभमेळ्यात मुस्लीम विक्रेत्यांना मनाई करण्यात आली. कावड यात्रेच्या मार्गावरील ढाबे-हॉटेलांमध्ये त्याच्या मालकांचे नाव स्पष्टपणे प्रदर्शित करण्याची सक्ती करण्यात आली, त्याचप्रमाणे आता सर्वच हिंदू धार्मिक सणांपासून बिगर-हिंदूंना दूर ठेवण्याची गरज आहे. हे काम हिंदू धर्माचार्यांनी करणे अपेक्षित आहे. कारण, भारतातील वरिष्ठ न्यायालये ही उघडपणे हिंदूविरोधी मानसिकतेने ग्रस्त आहेत. यंदा महाराष्ट्रात पंढरीच्या वारीत काही मुस्लीम कुराण पठण करीत होते, त्यास कोणीच आक्षेप का घेतला नाही? मुद्दा असा आहे की मुस्लीम व ख्रिस्ती यांच्या धार्मिक कार्यक्रमात अन्य धर्मीयांना प्रवेश नसतो. हेच धोरण जर हिंदूंनी अनुसरले, तर मात्र त्यांच्यावर जातीयवादी, कट्टरवादी आणि असहिष्णुतेचा आरोप केला जातो. म्हणूनच आता हिंदूंच्या सणांतील ही भेसळ थांबविण्याची निकड जाणवते आहे.

सध्या न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत, इंडोनेशियाच्या पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा शेवट ‘ओम शांती ओम’ या शब्दांनी केला. इंडोनेशिया हा जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश आहे. त्या देशाच्या पंतप्रधानांना जागतिक स्तरावर आपल्या भाषणाची सांगता एका हिंदू मंत्राने करावीशी वाटली आणि त्यास त्यांच्या देशातील कोणीही आक्षेप घेतला नाही. भारतातील मुस्लिमांना हिंदू श्लोक सोडाच, पण ‘भारतमाता की जय’ म्हणण्याचेही वावडे वाटते. आता तर संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरबस्तानातही हिंदू मंदिरे उभी राहत आहेत. जेथे इस्लामचा उदय झाला, तेथील लोकांना त्यात काही वावगे वाटत नाही. म्हणजे समस्या भारतातील मुस्लिमांच्या मानसिकतेत आहे. भारतातील बहुसंख्य हिंदू या मुस्लिमांचे हे लाड आणि नखरे चालवून घेतात, म्हणून त्यांनी दिवसेंदिवस अधिकच कट्टरता दाखविण्यास प्रारंभ केला आहे.

गेल्याच आठवड्यात लंडनमध्ये स्थलांतरितांना परत पाठविण्याच्या मागणीसाठी, लाखो लोक रस्त्यावर आले होते. यावरून तेथील जनतेलाही आता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे लादल्या जात असलेल्या परया संस्कृतीची जाणीव होऊ लागली आहे आणि त्याचे दुष्परिणामही भोगावे लागत आहेत. पण, भारतातील झोपाळू हिंदू तर कुंभकर्णापेक्षाही अधिक गाढ निद्रेत आहेत. त्यांना कधी जाग येणार?


राहुल बोरगांवकर

Powered By Sangraha 9.0