स्वदेशी शस्त्रनिर्मितीची अत्याधुनिक रायफल आता 'CRPF' कडे

    23-Sep-2025
Total Views |

मुंबई : भारताच्या संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादनाला चालना देणारा एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. देशातील आघाडीची पायाभूत सुविधा कंपनी MEIL (मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड) च्या ICOMM टेली लिमिटेड या ग्रुप कंपनीला केंद्रीय राखीव पोलिस दलासाठी (CRPF) २०० - CSR 338 स्नायपर रायफल्स पुरवण्याचा मोठी संधी मिळाली आहे.

'ऑपरेशन सिंदूर' सारख्या महत्त्वाच्या मोहिमांसाठी भारताला स्वदेशी शस्त्रांची गरज असल्याचे अधोरेखित झालय. याच अनुषंगाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या GST घोषणेत “भारतीय उत्पादने वापरा” आणि “भारतात निर्मित वस्तूंना प्राधान्य द्या” असा स्पष्ट संदेश दिला होता. या दिशेने अशी उत्पादनाची भारतात निर्मीती होणे भारताच्या संरक्षण सिध्दतेत नक्कीच भर टाकणारी असेल

या रायफल्स हैदराबादमधील नव्याने सुरू झालेल्या ICOMM-CARACAL स्मॉल आर्म्स कॉम्प्लेक्समध्ये तयार केल्या जातील. ही उत्पादन सुविधा UAE मधील CARACAL कंपनीसोबत भागीदारीत उभारण्यात आली असून, ती भारताच्या मेक इन इंडिया मोहिमेचा एक भाग आहे.

CSR ३३८ ही उच्च कार्यक्षमतेची स्नायपर रायफल असून ती अचूकतेसाठी प्रसिद्ध आहे. या ऑर्डरची पहिली खेप २०२५ च्या अखेरीस CRPF ला दिली जाणार आहे. ICOMM चे संचालक सुमंत पातुरु म्हणाले, “हे केवळ रायफल्स पुरवण्याचे काम नाही, तर भारताची संरक्षण क्षमता वाढवणे, हैदराबादमध्ये उच्च दर्जाचे रोजगार निर्माण करणे आणि जागतिक तंत्रज्ञानाचे स्थानिक हस्तांतरण हे आमचे उद्दिष्ट आहे.”