राज्यावर आस्मानी संकट! मराठवाड्यातील लाखो हेक्टर पीके पाण्याखाली, सोलापूर, हिंगोलीत भीषण पूरस्थिती

23 Sep 2025 20:03:41

मुंबई :
गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेल्या पावसामुळे अस्मानी संकट ओढावले आहे. शेतात शिरलेल्या पाण्यामुळे पिकांचे फार नुकसान झालेले आहे. सांगली, धाराशिव, अमरावती, जालना, नाशिक, लातूर या जिल्हयांमध्ये पुरस्थितीमुळे हीच परिस्थिती आहे. सांगलीतील ओसंडून वाहणाऱ्या धबधब्यांचे व्हिडिओ, नुकसानग्रस्त पिकांचे व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसला तर प्राण्यांची जीवीतहानी झाली.


मराठवाड्यात २१ लाख हेक्टर पीके पाण्याखाली गेली आहेत. ऊस, सोयाबीन, सारख्या पिकांचे नुकसान झाले. धाराशिव येथे पुरस्थितीमुळे ४१ जनावरांचा मृत्यू झाला. बाणगंगा नदी जवळील पुलही कोसळला. अमरावतीत सोयाबीन आणि संत्र्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे पावसामुळे १० ते १५ गावांचा संपर्क तुटला. सोलापुरमध्ये नदीकाठच्या गावांना फार नुकसान झाले आहे.


अनेक गावं पाण्याखाली आली आहेत. हिंगोलीत ९० नागरिकांनी मंदिरामध्ये आसरा घेतलेला आहे. चौंडी भैरोबा गावातील ओढ्यावरील पूल तुटला. नागरिकांचा संपर्क तुटला. पुरस्थितीमुळे लहान मुलांची शाळा मंदिरामध्ये भरवण्यात आली. बीडमधील हिंगवणी आणि पेंडगाव येथील नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरीत होण्याच्या सुचना दिल्या.


राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यातील लासलगावात पावसामुळे पीकांचे फार नुकसान झाले आहे. द्राक्ष, मका, सोयाबीन, टोमॅटो, इत्यादी फळ-भाज्यांचे नुकसान झाले आहे. बीड पिंपळगाव कानडा गावामध्ये १२ लोक पुराच्या पाण्यात अडकले. एनडीआरएफची काही लोकांना त्यांच्या मदतीस पाठव्यात आले आहे.


करमाळा तालुक्यातील संगोबा मंदिरात अडलेल्या ९० जणांना रेसक्यु करण्यासाठी आलेली होडी रस्त्याचा अंदाज न आल्याने पाण्यात ती होडी अडकली. धाराशिव जिल्ह्यामध्ये पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेली आहेत. जालन्यातील नागरिकांना पुरस्थितीमुळे रात्री २ वाजताच्या सुमारास गाव सोडावे लागले. बुलडाणा जिल्हयातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पूर नुकसानासाठीची मदत जाहीर करण्यात आलेली आहे.






Powered By Sangraha 9.0