
मुंबई : संजय राऊत यांनी जय शाह यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्याऐवजी राऊतांनाच 'पाकिस्तान रत्न' पुरस्कार दिला पाहिजे. तसेच त्यांची पाकिस्तानमध्ये रवानगी केली पाहिजे, अशी मागणी भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली.
संजय राऊत यांनी भारत-पाकिस्तान सामन्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना नवनाथ बन म्हणाले की,"संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सकाळी देशाच्या विरोधात खडे फोडायला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात त्यावेळी देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना हादरे बसतात. तसेच हादरे राऊत यांना बसले आहेत. मोदींनी आधीही पाच वाजता देशाला संबोधित केले आहे. काल त्यांनी जीएसटीमधून दोन लाख कोटींचा दिलासा दिला. सामान्य माणसाच्या फायद्याच्या घोषणा केल्या. पंतप्रधान मोदी ५ वाजता बोलून सर्वसामान्यांना दिलासा देतात तर राऊत रोज सकाळी ९ वाजता राहुल गांधी आणि सोनिया गांधींना दिलासा देता. त्यांचा सकाळी ९ वाजताचा भोंगा देशविरोधी शक्तींसाठी असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजवर देशालाऐतिहासिक भेटी दिल्यात. पण संजय राऊत यांना हे दिसत नाही. त्यांनी आधी पत्राचाळीतील मराठी माणसाचे फसवून उचललेले ५०-५०लाख रुपये परत द्या."
...तर राऊतांनी फटाके फोडले असते"पाकिस्तानी खेळाडू सोहबजादा फरहान याने मैदानावर केलेल्या कृतीचा आम्ही सगळे निषेध करतो. पण भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानला दोनदा पराभूत करून क्रिकेटरूपी मिसाईल टाकले आहे. भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीवर संजय राऊतांचे लक्ष नाही. सूर्यकुमारसारख्या खेळाडूंनी पाकिस्तानचा अहंकार चिरडला. भारतीय खेळाडूंनी दोनदा पाकिस्तानला पराभूत केले पण राऊत यांनी एकदाही त्यांच्या अभिनंदनाचे ट्विट केले नाही. संजय राऊत यांना अंधभक्त बोलण्याचा अधिकार नाही कारण ते स्वतः गुलाम आहेत. त्यांना पाकिस्तानच्या क्रिकेपटूंचे नाव तोंडपाठ आहे. मात्र, आपल्या कॅप्टनचे नाव ते विसरतात. कारण त्यांचे पाकिस्तानवर प्रेम आहे. काल पाकिस्तानची टीम जिंकली असती तर संजय राऊतांनी फटाके फोडले असते. पण भारतीय टीम जिंकल्याने त्यांच्या पोटात दुखले. संजय राऊत जुगारी असून त्यांनी पाकिस्तानच्या बाजूने पैसे लावले होते. परंतू, पाकिस्तानचा पराभव झाल्याने त्यांची चिडचिड होते.
"आज भारताची राष्ट्रभक्ती ही मोदीजींच्या पॅटर्नवर चालते. हा ‘मोदी पॅटर्न’ म्हणजे घरात घुसून शत्रूचा नाश करणे. हा पॅटर्न भारताच्या १४० कोटी जनतेला माहित आहे. हा नवा भारत घाबरत नाही, रडत नाही, तर पाकिस्तानला थेट उत्तर देतो. दुसरीकडे संजय राऊतांचा पॅटर्न म्हणजे पाकिस्तानचे झेंडे फडकवणे, पाकिस्तानचा उदो-उदो करणे आणि पाकिस्तानचे गुणगान गाणे. हा पाकिस्तानचा पॅटर्न ते सतत पुढे नेत आहेत. संजय राऊत हे नाशिकचे संपर्कप्रमुख होते. त्यांनी तिथली शिवसेना उध्वस्त केली. आता त्यांनी मोर्चा ठाण्याकडे वळवला आहे. त्यामुळे ठाणेकरांनी सावध राहावे, अन्यथा ठाण्याचीही नाशिकसारखीच वाट लागेल. तसेच राऊतांनी ठाण्याचे ‘बीड होईल’ असे वक्तव्य करून बीडची बदनामी केली. पण बीड हा संत, साहित्यिक, महात्म्यांचा जिल्हा आहे. त्यामुळे एक दोन घटनांवरून संपूर्ण जिल्ह्याची बदनामी करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही," असा इशाराही नवनाथ बन यांनी दिला.
राऊतांचा झेंडा पाकिस्तानचा"संजय राऊत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सतत टीका करतात. पण आमचा झेंडा हिंदूत्वाचा आणि दांडा राष्ट्रभक्तीचा आहे. याऊलट संजय राऊतांचा झेंडा हा पाकिस्तानचा आहे आणि त्याचा दांडा राहुल गांधींचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा हा शंभर वर्षांची परंपरा आहे. संघ हिंदुत्वाचा भगवा झेंडा उंचावत राष्ट्रभक्तीचा नारा देतो. तर संजय राऊतांचा अजेंडा हा पाकिस्तानचा असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे," अशी टीकाही नवनाथ बन यांनी केली.