६० वर्षांहून अधिक काळ भारतीय आकाशात धैर्य आणि शौर्याची अमिट छाप सोडणारे ‘मिग-२१’ अखेर दि. २६ सप्टेंबर रोजी राष्ट्रसेवेतून निवृत्त होत आहे. ‘आकाशाचा अथक पाहरेकरी’ आणि ‘लीजंड’ म्हणून ओळखला जाणारा हा भारतीय वायुदलाचा योद्धा, अनेक वैमानिकांचा प्रेरणा स्रोत राहिला आहे. युद्धजन्य परिस्थितीत आकाशाच्या प्रत्येक कोपर्यात दिला गेलेला पहारा हा केवळ सैनिकी कर्तव्यच नव्हे, तर ‘मिग-२१’च्या देशभक्तीची गाथा होती. अनेक वैमानिकांनी त्याच्याआधारे आपल्या पराक्रमाचा इतिहास लिहिला. ‘मिग-२१’च्या प्रत्येक मोहिमेची यशोगाथा आजही सर्वांना प्रेरणा देते. ‘मिग-२१’ फक्त एक विमान नव्हे, तर भारतीय आकाशातील शौर्य, धैर्य आणि वीरतेचे अमर प्रतीक आहे. प्रत्येक उड्डाण, प्रत्येक मोहीम प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आजही विशेष स्थान बाळगून आहे. भारतीय वायुदलाच्या इतिहासात आपल्या पार्थ पराक्रमाने अजरामर झालेल्या ‘मिग-२१’ या विमानाच्या कारकिर्दीचा घेतलेला आढावा...
‘मिग’ची प्राथमिक माहिती‘मिग २१’चे पूर्ण नाव मिकोयान-गुरेविच असे असून, हे विमान रशियन बनावटीचे आझे. या नावामध्ये आर्टेम मिकोयान आणि मिखाईल गुरेविच दोन रशियन हवाई अभियंत्यांच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. अन्य विमान बनविणार्या कंपन्यांप्रमाणेच १९३९ मध्ये द्वितीय महायुद्धाच्या काळात विमानांच्या आरेखनासाठी स्थापन झालेले हे एक संचालनालय होते. दुसर्या महायुद्धाच्या काळात प्रोपेलर आधारित मिग विमानांची संख्या मर्यादित होती मात्र, १९४६ साली प्रथम उड्डाण केलेले ‘मिग-९’ हे तत्कालीन सर्वोत्तम जेट होते. कोरियन युद्धात या विमनाची भूमिका महत्त्वाची ठरली होती. मिगचा प्रवास इथून सुरू झाला तो १९५५ साली ‘मिग-२१’ या भारतासोबतच अनेक राष्ट्रांच्या हवाई दलापर्यंत पोहोचतो. आता ‘मिग-२५’पर्यंत या प्रारुपापर्यंत मिग विमानांमध्ये सुधारणा झाली आहे.
‘मिग-२१ पीएफएम’ची ठळक वैशिष्ट्ये
कमाल गती - माख २.०५ आकाशात असताना, समुद्रपातळीवर माख १.०५
उंची गाठण्याचा सुरुवातीचा वेग - ५८ हजार फूट/मिनिट
कमाल उड्डाण उंची - ५७ हजार, ४०० फूट
पंखाचा विस्तार - २३.४६ फूट
लांबी - ४०.२९ फूट
उंची - १३.४६ फूट
वजन - १२ हजार, ६०० पाऊंड रिक्त; उड्डाणावेळी - २२ हजार, ९२५ पाऊंड (कमाल)
कमाल भारवाहक क्षमता - ३ हजार, ३१० पाऊंड
बंदूक
हवेतून हवेत वेध घेणारी क्षेपणास्त्रे - के-१३/एए२ अटोल, आर-६०/एए- ८
विविध बॉम्ब आणि रॉकेट्स नेण्याची क्षमता - टुमन्स्की आर-२५-३०० टर्बोजेट, १५ हजार, ६५० पाऊंड थ्रस्ट
भारतीय हवाई दलात मिग‘मिग-२१’चा भारतीय हवाई दलाच्या सेवेतील प्रवेश १९६३ सालामधील ट्रायल बेसिसपासून झाला. सुरुवातीला फक्त १३ विमाने सेवेत घेतली गेली. भारतीय हवाई दलाने ‘मिग-२१’च्या विविध प्रारूपांपैकी टाईप ७४ प्रारुप निवडले होते. १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात या विमानाने मोठी कामगिरी बजावली होती. या विमानाच्या सहाय्याने भारतीय वायूदलाच्या वैमानिकांनी अत्याधुनिक विमानांनाही पाणी पाजून जगाला विस्मित केले आहे.
मिगने पाडलेली वेगवेगळ्या पिढ्यांतील विमाने
पहिली पिढी ‘एफ ८६ साब्रे’- पाकिस्तानी हवाई दलातील तत्कालीन आधुनिक अशी कितीतरी विमाने भारतीय हवाई दलाने १९६५ आणि १९७१ सालच्या युद्धात पाडली.
दुसरी पिढी - चिनी परवान्यांतर्गत ‘एफ-०६’ म्हणून पाकिस्तानी हवाई दलामार्फत संचालित केली जाणारी ‘एफ १०४’ आणि ‘मिग-१९’ या विमानांनीही १९७१च्या युद्धात,‘मिग-२१’चा पराक्रम अनुभवला आहे.
तिसरी पिढी - ‘मिराज ३’ - दि. ९ डिसेंबर १९७१ रोजी स्क्वाड्रन लिडर सिंधघट्ट सुब्बरामू यांना पाकिस्तानी हवाई दलाचे ‘मिराज ३’ दिसले. त्यांनी या विमानावर दोन ‘के-१३’ क्षेपणास्त्रे डागली आणि तत्काळ हे विमान त्यांच्या रडारवरून गायब झाले.
चौथी पिढी - फेब्रुवारी २०१९ साली झालेल्या हवाई पाठलागात पाकिस्तानचे एफ १६ विमान भारतीय वैमानिक अभिनंदन यांनी ‘मिग-२१’च्या मदतीनेच पाडले होते.
- भारतीय हवाई दलातील पहिले अपाश्चात्य बनावटीचे विमान
भारतीय हवाई दलाच्या सेवेत असलेले मिग २१ अनेक विविध प्रकार...
मिग २१ एफ-१३ टाईप ७४
मिग २१ पीएफ टाईप ७६
मिग २१ एफएल टईप ७७
मिग २१ एमएफ
मिग २१ एम
मिग २१ बिस
मिग २१ बायसन
मिग २१ यु
मिग २१ युएम
- भारतीय हवाई दलाचा १९७० ते २००० सालापर्यंत कणा
- कुठल्याही प्रकारच्या वातावरणात संचालन करण्याची आणि विविध प्रकारची शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची अलौकिक क्षमता
अनेक महत्त्वाच्या युद्धांत समावेश-
-१९६५-१९७१ची भारत-पाकिस्तान युद्धे, कारगिल युद्ध, बालाकोटवरील हवाई हल्ला यांसारख्या महत्त्वाच्या युद्धांत समावेश
‘मिग-२१’ विमानाचे अपघात
‘मिग-२१’ विमानाचे विविध प्रकारच्या मिगचे विविध प्रकारचे अपघात मिळून, आजवर २९७ अपघात झाले. सततच्या अपघातांमुळे ‘मिग-२१’ या विमानाला ‘उडती शवपेटी’ असेच नाव पडले होते. ‘मिग-२१’च्या या सातत्याने होत असलेल्या अपघातात भारतीय वायू दलाच्या अनेक वैमानिकांना हौतात्म्य आले.
मिग वापरणारे अन्य देश
आंगोला, युबा, गयाना, लिबिया, माली, मोझांबिक, उत्तर कोरिया, सुदान, सिरिया, युगांडा, येमेन
‘मिग-२१’च्या निवृत्तीची कारणे-
वारंवार होणारे अपघात हेच ‘मिग-२१’च्या निवृत्तीचे प्रमुख कारण आहे. त्याव्यतिरिक्त जुन्या झालेल्या एअरफ्रेम, वाढता दुरूस्ती खर्च ही कारणेदेखील आहेत. शिवाय काळानुरूप ‘मिग-२१’चे तंत्रज्ञान मागे पडल्याने, नव्या विमानांची गरज खूप आधीपासूनच व्यक्त केली जात होती.
‘मिग-२१’चा उत्तराधिकारी कोण?
‘मिग-२१’च्या निवृत्तीनंतर भारतीय हवाई दलामध्ये त्याची जागा भारतीय बनावटीचे ‘तेजस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट मार्क १ ए’ घेणार आहे. या विमानाकडे ‘मिग-२१’चे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे.
‘मिग-२१’ आणि ‘राफेल’मधील मूलभूत फरक