
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभ घेणाऱ्या महिलांना आता ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले असून ही ई-केवायसीची प्रक्रिया आता सोपी झाली आहे. या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी आणि लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता
https://ladakibahin.maharashtra.gov. in या संकेतस्थळावर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल. पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
ई-केवायसी प्रक्रिया कशी करणार?१) ई-केवायसीसाठी लिंक https://ladakibahin.maharashtra.gov.in
२) मुखपृष्ठावर ई-केवायसी फॉर्म येईल.
३) या फॉर्ममध्ये आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक नमूद करा.
४) आधार प्रमाणीकरणासाठी सेंड ओटीपी या बटणावर क्लिक करा.
५) ओटीपी टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
६) केवायसी आधीच पूर्ण झाली आहे की, नाही ते प्रणाली तपासेल.
७) आधीच पूर्ण झाली असेल, तर 'ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे' असा संदेश दिसेल.
८) जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत आहे की, नाही हे तपासले जाईल
९) आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.
१०) पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नमूद करावा
११) त्यानंतर आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल.
१२) स्वत: किंवा कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरी नसल्याबाबत प्रमाणित करावे लागेल.
१३) कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे प्रमाणित करावे.
१४) वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे आणि सबमिट बटण दाबावे.