दिल्ली विद्यापीठात अभाविपचा दणदणीत विजय, ' जेन झी'चा भगव्याला पाठिंबा

19 Sep 2025 18:58:03

नवी दिल्ली, दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या (डुसू) निवडणुकीत अखिल भारतीय विद्यापीठाने (अभाविप) दणदणीत विजय मिळवला आहे. अभाविपने अध्यक्षपदासह तीन जागा जिंकल्या आहेत. शुक्रवारी (१९ सप्टेंबर) जाहीर झालेल्या निकालांमध्ये त्याचवेळी काँग्रेसशी संलग्न असलेल्या एनएसयुआयला उपाध्यक्षपदावर समाधान मानावे लागले आहे.

डुसू निवडणुकीत यंदा एकूण १,५३,१०० नोंदणीकृत विद्यार्थी मतदारांपैकी ६०,२७२ विद्यार्थ्यांनी निवडणुकीत मतदान केले. मतदानाची टक्केवारी ३९.३६ टक्के होती. एकूण २१ उमेदवारांनी निवडणूक लढवली, परंतु मुख्य लढत अभाविप आणि एनएसयुआय यांच्यातच झाली.

डुसू अध्यक्षपदी अभाविपचे आर्यन मान विजयी झाले, त्यांना २८ हजार ८४१ मते मिळाली. उपाध्यक्षपदी एनएसयुआयचे राहुल झांसल विजयी झाले. सचिव आणि संयुक्त सचिवपदी अनुक्रमे अभाविपचे कुणाल चौधरी आणि दीपिका झा यांना विजय मिळाला.

विद्यार्थ्यांचा पाठिंबा 'राष्ट्र प्रथम' विचारधारेस

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मिळवलेल्या प्रचंड विजयाबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. हा विजय युवांच्या ‘राष्ट्र प्रथम’ या विचारधारेवरील दृढ विश्वासाचे प्रतिबिंब असल्याचे स्पष्ट झाले आहे. या यशामुळे परिषदेची विद्यार्थी शक्ती राष्ट्रशक्तीत रूपांतरित करण्याच्या प्रवासाला अधिक वेग मिळणार आहे.

Powered By Sangraha 9.0