दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे; अध्यात्मरंग महोत्सवाचे आयोजन
18-Sep-2025
Total Views |
मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने अध्यात्मरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात २० ते २१ सप्टेंबर २०२५ या कालवधीत दररोज सायंकाळी ५.३० वाजता होईल. २० सप्टेंबर या दिवशी `श्रीमद् दासबोध – श्री समर्थांचे आत्मस्वरुप’ या विषयावर शिल्पा जोशी यांचे तर २१ सप्टेंबर या दिवशी `तुकाराम महाराजांच्या अभंगातील विचारविश्व’ या विषयावर सदानंद मोरे यांची व्याख्यान होईल. अधिकाधिक रसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ७७००९९४४९५, २४३०४१५०