ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन कॉल, वाढदिवसाचं निमित्त... मोदी-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली?

17 Sep 2025 19:08:09

नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुभेच्छा दिल्यात खऱ्या मात्र, या शुभेच्छा म्हणजे भारत - अमेरिका संबंध सुधारण्याचे संकेत आहेत का? अर्ध्या तासांचा कॉल दोन्ही देशांचे संबंध पुनर्स्थापित करण्यासाठीचा प्रस्ताव होता का? असे प्रश्न निर्माण होत आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माझे मित्र संबोधित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ट्रम्प यांनी दिलेल्या शुभेच्छा फार महत्त्वाचे प्रश्न निर्माण करतात. ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रबंदीचे श्रेय स्वतःला आपणच युद्ध थांबवलं, असा निराधार दावा केला होता. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णयदेखील घेतला. मात्र भारताने अमेरिकेचा युद्धबंदीचा दावा प्रत्येकवेळी फेटाळून लावला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला जीडीपीच्या बाबतीत जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाची 'मृत' अर्थव्यवस्था म्हणून घोषित केले होते, या अनेक महिन्यांच्या वादानंतर हा अर्धा तासाचा फोन कॉल दोन्ही देशांचे संबंध पुन्हा स्थापित करण्यासाठीचा प्रस्ताव होता का? अशा सर्वत्र चर्चा सुरु आहेत.

ट्रम्प यांनी दिलेल्या शुभेच्छा...

डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदीं सोबत किमान आर्धा तास फोन काल वर शुभेच्छा दिल्या तसेच पंधरा मिनिटा नंतर एक्स च्या अकाउंट वर ’’माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नुकताच एक छान फोन कॉल झाला. मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या! ते खूप चांगले काम करत आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद! अध्यक्ष डीजेटी’’ असे ट्रम्प यांनी त्यांच्या एक्स अकाउंटच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.


सोबतच मोदींनी देखील आपल्या एक्स अकाउंटवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, माझ्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त फोन कॉल करुन तुम्ही हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याप्रमाणेच, मी देखील भारत-अमेरिका व्यापक आणि जागतिक भागीदारीला नवीन उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी तुमच्या पुढाकारांना आम्ही पाठिंबा देतो." असे मोदी म्हणाले.





Powered By Sangraha 9.0