उल्हासनगरमध्ये 'आचल पॅलेस बार'वर पोलिसांचा छापा, २३ जणांवर गुन्हा दाखल

17 Sep 2025 16:59:28

उल्हासनगर : उल्हासनगरमधील पवई चौक परिसरात असलेल्या 'आचल पॅलेस बार'वर पोलिसांनी छापा टाकला आहे. बेकायदेशीरपणे बार चालवणे आणि अश्लील कृत्ये करण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल बारचा चालक, मॅनेजर, वेटर, १० बारबाला आणि ८ ग्राहकांसह एकूण २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​ही कारवाई मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पथकाने १५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १०:१५ वाजता केली. 'आचल पॅलेस बार'मध्ये महिला तोकड्या कपड्यांमध्ये गिऱ्हाइकांना आकर्षित करत होत्या आणि त्यांच्यासोबत अश्लील हावभाव करत असल्याचे पोलिसांना आढळून आले.

या प्रकरणी पोलिसांनी बारचा चालक निधी जया शट्टी, मॅनेजर रविकांत श्रीदिनेशप्रसाद तिवारी, वेटर रमेश श्रीपती मलिक, प‌द्मालोचन सुदम माझी आणि शिवमकुमार श्रीरमेशचंद्र गुप्ता यांच्यासह १० बारबाला आणि ८ ग्राहकांवर गुन्हा दाखल केला आहे.

Powered By Sangraha 9.0