"हा नवा भारत आहे, घरात घुसून मारतो…"; पंतप्रधान मोदींनी पुन्हा पाकिस्तानला ठणकावले!

17 Sep 2025 15:12:44

भोपाळ : (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, दि. १७ सप्टेंबर रोजी ७५ वा वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात एका सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. "हा नवीन भारत आहे आणि तो कोणाच्याही अणुहल्ल्याच्या धमक्यांना घाबरत नाही", असेही पंतप्रधान मोदींनी ठणकावले.

मोठ्या रॅलीला संबोधित करताना मोदी म्हणाले की, "आज देश मां भारतीच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता देतो. पाकिस्तानहून आलेल्या दहशतवाद्यांनी आपल्या माता-भगिनींचे सिंदूर पुसले होते. आपण ऑपरेशन सिंदूर करून दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले. आपल्या सैनिकांनी काही क्षणांतच पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले", असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पुढे बोलताना मोदींनी जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरच्या एका व्हिडीओचा दाखला दिला. या व्हिडिओमध्ये जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर मसूद इलियास काश्मिरीने ७ मे रोजी झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्य ठार झाल्याचे सांगितले आहे. मोदी म्हणाले की, "कालच देश आणि जगाने पाहिले की, पुन्हा एका पाकिस्तानी दहशतवाद्याने रडत-रडत परिस्थिती सांगितली... हा नवीन भारत आहे, हा कोणाच्याही अण्वस्त्र धमक्यांना घाबरत नाही. हा नवा भारत आहे, घरात घुसून मारतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.







Powered By Sangraha 9.0