नवी दिल्ली : जागतिक नेते नेहमीच त्यांचा मित्र देशांच्या नेत्यांना व्हिडिओच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात असे नाही. मात्र आज बुधवार दि. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर जागतिक नेत्यांच्या व्हिडिओ संदेशांची रांगच लागलेली पाहायला मिळते आहे. इस्रायलचे बेंजामिन नेतान्याहू, ऑस्ट्रेलियाचे अँथनी अल्बानीज, न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन आणि इटलीच्या जॉर्जिया मेलोनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवाय भारतीय चित्रपट सृष्टीतल्या अनेक दिग्गज कलाकारांनी देखील सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांनी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त 'वंदनिया है देश मेरा' नावाच्या एका नवीन गाण्याचे अनावरण करत ते गाणे 'X' वर शेअर केले आहे. सोबतच मल्याळम चित्रपट क्षेत्रातील निर्माते वीर रेड्डी एम यांनी 'माँ वंदे' या नरेंद्र मोदींच्या जीवन प्रवासावर आधारित बायोपिकची घोषणा केली आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले, "पंतप्रधान मोदी, माझे मित्र नरेंद्र, मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. तुम्ही तुमच्या आयुष्यात भारतासाठी खूप काही साध्य केले आहे आणि आपण एकत्रितपणे भारत आणि इस्रायलमधील मैत्रीमध्ये खूप काही साध्य केले आहे. मी तुम्हाला भेटण्यास उत्सुक आहे कारण आपण आपली भागीदारी आणि आपली मैत्री आणखी उंचावर नेऊ शकतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या मित्रा".
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी त्यांच्या २१ सेकंदांच्या व्हिडिओ संदेशात मोदींना "मित्र" म्हणून गौरवले आणि ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाच्या भूमिकेचे कौतुक देखील केले. ऑस्ट्रेलिया हा भारताच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे.
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान म्हणाला, “आज, पंतप्रधान मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त, मी त्यांना शुभेच्छा देतो. एका छोट्या शहरापासून जागतिक मंचापर्यंतचा तुमचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. या प्रवासात तुमची शिस्त, कठोर परिश्रम आणि देशाप्रती समर्पण दिसून येते. ७५ वर्षांच्या वयात तुमची ऊर्जा आमच्यासारख्या तरुणांनाही मागे टाकते. तुम्ही नेहमीच निरोगी आणि आनंदी राहावे अशी मी प्रार्थना करतो.
अभिनेता आमिर खाननेही एका व्हिडिओद्वारे शुभेच्छा देताना म्हटले आहे की,“आपल्या देशाच्या विकासात तुम्ही दिलेले योगदान नेहमीच लक्षात राहील. मी प्रार्थना करतो की ईश्वर तुम्हाला नेहमीच शक्ती देवो.”
अभिनेत्री आलिया भट्टनेही एका व्हिडिओच्या माध्यमातुन एक हृदयस्पर्शी संदेश शेअर केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे नेतृत्व आपल्या महान राष्ट्राचे भविष्य घडवत राहो आणि आपल्याला आणखी प्रगतीकडे घेऊन जावो,” असे ती म्हणाली.
शिवाय गायक शंकर महादेवन यांनी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त 'वंदनिया है देश मेरा' नावाच्या एका नवीन गाण्याचे अनावरण करत ते गाणे 'X' वर शेअर केले आणि त्यांनी लिहिले कि , “आपल्या प्रिय माननीय पंतप्रधानांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! नेतृत्व आणि प्रेरणेबद्दल धन्यवाद. हे गाणे तुम्हाला आणि आपल्या महान राष्ट्राला समर्पित आहे.”
मल्याळम चित्रपट क्षेत्रातील निर्माते वीर रेड्डी एम यांनी 'माँ वंदे' या नरेंद्र मोदींच्या जीवन प्रवासावर आधारित बायोपिकची घोषणा केली आहे.या बायोपिकमध्ये मल्याळम अभिनेते उन्नी मुकुंदन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारणार असून हा चित्रपट बालपणापासून राष्ट्रीय नेतृत्वापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाचे वर्णन करेल, तसेच त्यांच्या आई हीराबेन मोदींशी असलेल्या त्यांच्या नात्यालाही उजागर करेल.
बॉलिवुड अभिनेते अजय देवगण यांनी देखील पंतप्रधानांना शुभेच्छा देत लिहिले कि, "सर, तुमच्या नेतृत्वाने प्रत्येक भारतीयामध्ये आशा आणि अभिमान निर्माण केला आहे. तुमच्या खास दिवशी, आम्ही तुमच्या दीर्घायुष्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी आणि देशासाठी शाश्वत प्रेरणा मिळावी यासाठी प्रार्थना करतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा, मोदीजी #जयहिंद."
सुपरस्टार रजनीकांत यांनी पोस्ट केले, "सर्वात आदरणीय, माननीय आणि माझे प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुष्य, चांगले आरोग्य, मनःशांती आणि आपल्या प्रिय राष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी शाश्वत शक्ती मिळो, जय हिंद."
दरम्यान, कमल हासन म्हणाले, "माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि भारताच्या जनतेच्या सेवेत शक्ती मिळो अशी शुभेच्छा."