साच्याबाहेरचे मोदी : नेतृत्वाची मानवी बाजू

    16-Sep-2025
Total Views |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व बहुतेकदा छोट्या छोट्या अनियोजित क्षणांमधून मोठा प्रभाव टाकते. धोरणे आणि व्यासपीठांच्या पलीकडे जाऊन हे नेतृत्व सहानुभूती आणि नम्रतेने केलेल्या उत्स्फूर्त कृत्यांमधून झळाळून व्यक्त होते ज्यामुळे उच्च पदांना मानवी भावनांची जोड मिळते.

मोदी संसदेच्या पायऱ्यांपाशी नतमस्तक होतात. ते लहान मुलांशी हस्तांदोलन करण्यासाठी सुरक्षा कवच भेदून जातात. अशा सर्व दृश्यांनीराजकीय संस्कृतीला जेथे संपर्क, दयाळूपणा आणि सन्मान यांना निकषांइतकेच महत्त्व आहे अशा “नव्या सामान्य परिस्थिती”कडे सरकवले आहे.

युगांच्या आणि झलकांच्या दरम्यान अशा क्षणांतून दिसणारी एक संक्षिप्त आणि भावनिक कहाणी आहे जी अशा एका नेत्याचे दर्शन घडवते जो केवळ दूरदृष्टीनेच नव्हे तर स्नेहाने देखील मन वळवण्याचा प्रयत्न करतो.

नेतृत्वाच्या झालरीखालील नम्रता आणि सच्चेपणा

मे २०१४ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान होऊ घातलेले मोदी संसदेत आले, तेही थाटामाटात नव्हे तर अत्यंत आदराने आले. ते संसद भवनापाशी क्षणभर थांबले, खाली वाकले आणि त्यांनी लोकशाहीचे मंदिर समजून संसदेच्या पायऱ्यांवर त्यांचे मस्तक टेकवले. एक नेता संसद भवनाच्या गालिचावर नतमस्तक झाला आहे, डोळे मिटून माथा टेकवतो आहे हे चित्र सर्वदूर प्रसिद्ध झाले.

अशा सुरुवातीच्या क्षणांच्या नोंदींनी संस्थांना व्यक्तींपेक्षा अधिक महत्त्व देणाऱ्या आणि भव्यतेपेक्षा कृतज्ञतेवर अधिक भर देणाऱ्या नेतृत्वाचे शब्दप्रभुत्व निश्चित केले. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पहिल्याच भाषणात भारताच्या लोकशाही वचनबद्धतेचा पुरावा म्हणून अत्यंत नम्र स्तरावरुन सुरुवात करण्यापासूनची स्वतःची वाटचाल सांगितली आणि गरिबांसाठी विश्वासू ठरेल अशा रुपात सरकारचे दर्शन घडवले.

लहान मुलांशी संवाद साधण्यासाठी शिष्टाचार बाजूला ठेवले

लहान मुले तसेच तरुण वर्ग यांच्याशी उत्स्फूर्तपणे जवळीक साधण्याची नरेंद्र मोदी यांची क्षमता हा मोदींच्या सार्वजनिक जीवनाचा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे.

वर्ष २०१८ मध्ये लाल किल्ल्यावरुन स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात त्यांनी मोटारगाड्यांचा ताफा थांबवला, सुरक्षा कवचाच्या बाहेर पाऊल टाकले आणि ते तिरंगा फडकवणाऱ्या शाळकरी मुलांच्या गर्दीत शिरले. त्यांनी त्या मुलांशी हस्तांदोलन केले, काही शब्दांची देवाणघेवाण केली आणि हा दिवस आयुष्यभर लक्षात ठेवतील अशा प्रकारे काही चेहरे उजळवून टाकले. गेल्या काही वर्षांत स्वातंत्रदिनी त्यांचे मुलांशी असलेले त्यांचे नाते अधोरेखित करणारे असेच हावभाव दिसून आले, आणि हे त्यांचे वागणे पुनःपुन्हा दिसून आले.

लहान मुले तसेच सोबतचे नागरिक यांची दखल घेऊन त्यांच्याप्रती काळजीचा विश्वास व्यक्त करण्याची हीच वृत्ती मिरवणुकांमध्ये देखील दिसून येते.

२०२४ मध्ये मध्य प्रदेशात झाबुआ येथे भाषण करत असताना ते मध्येच थांबले आणि प्रेक्षकांमध्ये वडिलांच्या खांद्यावर बसून हात उंचावणाऱ्या लहान मुलाच्या हाताला इजा होईल म्हणून त्यांनी हात खाली घेण्याची सूचना केली. एक साधी सूचना, एक प्रेमळ स्मित. त्यानंतर वाजलेल्या टाळ्यांच्या लाटेने सर्वांना आठवण करून दिली की सार्वजनिक व्यासपीठावरून बोलत असताना देखील एक नेता तुमच्या शेजाऱ्यासारखा तुमची काळजी घेऊ शकतो. अशा प्रकारच्या प्रसंगांतून त्या पदाच्या मागे असलेली व्यक्ती ठळकपणे दिसते.

व्हिडीओ : मध्य प्रदेशात झाबुआ येथील सभेत पंतप्रधान मोदींनी छोट्या समर्थकासाठी केलेली नम्र सूचना
https://www.youtube.com/watch?v=UF1fkMSeOpM

सीमारेषेवर करुणेचा अविष्कार: सैनिकांसह दिवाळसण

वर्ष २०१४ पासून, मोदींनी त्यांची प्रत्येक दिवाळी सैनिकांबरोबर साजरी केली आहे. सियाचेन आणि कारगिलपासून पंजाबच्या सीमांपर्यंत आणि कच्छ पर्यंत जेथे जेथे क्षितिजावर तिरंगा फडकतो तेथील सैनिकांपर्यंत मोदी पोहोचले. ते तेथे केवळ निरीक्षण करण्यासाठी नव्हे तर त्यांच्यासोबत भाकरतुकडा खाण्यासाठी आणि मिठाई वाटण्यासाठी जातात.

हातात लाडूंनी भरलेली थाळी घेऊन पंतप्रधान विनोद सांगत आणि हसतहसत सैनिकांमध्ये फिरत आहेत हे दृश्य आता परिचयाचे झाले आहे. दर वर्षी दिवाळीला देशाच्या सीमावर्ती प्रदेशाकडे होणारा त्यांचा हा प्रवास भावनांना रीतीमध्ये परिवर्तीत करतो.या भेटींमुळे मनोबल वाढते आणि नागरिकांना कळते की राज्य हे अमूर्त नाही, तर लोकांसाठी निकटचे, शीतल, धाडसी आणि कृतज्ञतेला पात्र आहे.

उत्सवांच्या पलीकडे, रुग्णालयात भेटी आणि मृतांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त होतात. प्रत्येक बाबतीत, सेवा ही समारंभापेक्षा श्रेष्ठ आहे.

प्राण्यांची आणि निसर्गाची काळजी

पंतप्रधान मोदींची सहानुभूती केवळ मानवांपुरती मर्यादित नाही. प्राण्यांबद्दलचे त्यांचे प्रेम आणि काळजी तितकीच स्पष्ट आहे. २०२० मध्ये, पंतप्रधानांच्या निवासस्थानातील एका लहान व्हिडिओमध्ये ते पहाटे आपल्या राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांना ममत्वाने धान्य खायला घालताना दिसतात.

त्यांनी पक्षांना त्यांच्या प्रभातफेरीतील साथीदार संबोधले असून त्यांच्या घरट्यांसाठी सुरक्षित जागा तयार करण्याबद्दल सांगितले आहे. हे दृश्य अनेकांना आश्चर्यचकित करते कारण ते खूप सामान्य होते: एक नेता जो हुकूम न सोडता काळजी घेतो.

पंतप्रधानांचे गायींबद्दलचे प्रेम त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा एक मार्मिक पैलू आहे, जो भारताच्या सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक पशू प्रजातींमधील घनिष्ट संबंध अधोरेखित करतो. त्यांनी त्यांच्या निवासस्थानी नवजात वासराचे स्वागत करत त्याचे नाव दीपज्योती ठेवले.

एक्स पोस्ट लिंक: https://x.com/narendramodi/status/1834843837409243216

गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गुरांसाठी लसीकरण मोहिमेसारखा पशु कल्याण कार्यक्रम, पतंग उडवण्याच्या उत्सवांमध्ये जखमी पक्ष्यांना वाचवण्याचे प्रयत्न आणि पशुवैद्यकीय शिबिरे यांना चालना दिली. ग्रामीण मेळ्यांमध्ये ते पशुपालन करण्यातच रमायचे. शेतकऱ्यांच्या पिकांइतकीच त्यांच्या प्राण्यांचीही ते विचारपूस करत असत.

भावनेच्या क्षणांमध्ये सळसळता उत्साह

मोदींच्या कार्यकाळातील काही अमिट प्रतिमा म्हणजे उत्स्फूर्त भावना. २०१९ मध्ये जेव्हा चांद्रयान-2 च्या लँडरचा संपर्क तुटला तेव्हा इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांना धक्का बसला. पंतप्रधान मोदींनी त्या शास्त्रज्ञाला सद्गदित झालेले पाहिल्यावर शांतपणे त्यांना आलिंगन देऊन पाठीवर थोपटले.

देशाच्या सर्वोच्च शास्त्रज्ञाचे सांत्वन करणारे राष्ट्रनेत्याचे छायाचित्र सर्व माध्यमात झळकले ते भव्यतेसाठी नव्हे तर मानवीय म्हणून.

त्याच वर्षी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना नमन करून आणि व्यासपीठावर त्यांचे पाय धुवून त्यांचा सन्मान केला. त्यांनी त्यांना विशाल मेळावास्थळ स्वच्छ ठेवणारे कर्मयोगी म्हटले. अदृश्य श्रम दृश्यमान झाले. लाखो लोकांसमोर प्रतिष्ठा पुनर्संचयित झाली.

सहानुभूतीला सार्वजनिक अपेक्षा बनवणे

या क्षणांनी केवळ एका दिवसासाठी मन उल्हसित करण्याहून अधिक काम केले आहे; त्यांनी नेत्यांच्या वर्तनाचा दर्जा उंचावला आहे. अंतर आणि निंदकतेसाठी अनेकदा टीका होणाऱ्या राजकीय संस्कृतीत, मोदींच्या वर्तनाने सार्वजनिक जीवनाचे मुलायम व्याकरण मुख्य प्रवाहात आणण्यास मदत केली: जसे की मंत्र्यांचा सैन्यासोबत भोजनाचा आस्वाद घेणे, शाळकरी मुलांसोबत खासदारांचे प्रदर्शनात सहभागी होणे आणि अधिकाऱ्यांद्वारे आघाडीच्या कर्मचाऱ्यांवर प्रकाश टाकणे. जेव्हा सुगम्यतेला सर्वोच्च प्राधान्य असते तेव्हा नेता आणि नागरिक यांच्यातील रेषा धूसर होते.

जनतेसाठी, या कथा सौम्य सूचना म्हणून काम करतात. स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुण्याने आपण आपले रस्ते आणि आपली घरे स्वच्छ करणाऱ्यांशी कसे वागतो याची चर्चा स्वयंपाकघरात रंगू लागली. मोराच्या व्हिडिओने शहरी रहिवाशांना पक्ष्यांना खायला घालण्यास आणि भटक्या प्राण्यांची काळजी घेण्यास उद्युक्त केले.

इस्रोने अपयशाचा क्षण ओशाळण्याचा नव्हे तर आधाराचा म्हणून स्वीकारला आहे. समाज माध्यम समूहात, क्लासरूम आणि कार्यालयात, हे क्षण नैतिकतेचे सूक्ष्म धडे म्हणून प्रसारित होतात: नेतृत्व करताना तुमच्या बुद्धीबरोबरच मनालाही प्राधान्य द्या.

भारत जसजसा वाटचाल करेल तसतसे हे भाग कदाचित देश या युगाची आठवण कशी ठेवतो याचा एक शाश्वत अध्याय तयार करतील - केवळ रस्ते बांधण्यासाठी आणि सुरू केलेल्या मोहिमांसाठीच नव्हे तर शीर्षस्थानी प्रस्थापित केलेल्या स्थितीसाठी देखील. सत्तेत दयाळूपणा फॅशनेबल बनवणे हे या काळातील सर्वात सखोल आणि चिरस्थायी योगदान ठरू शकते, ज्यामुळे भावी पिढ्या सहानुभूतीकडे अपवाद म्हणून नव्हे तर सार्वजनिक कार्यालयाचा पाया म्हणून पाहतील याची सुनिश्चिती होईल.