नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यात कधी हलगर्जीपणा केला नाही. एका व्हिडिओमध्ये जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मसूद इलियास काश्मिरी याने ऑपरेशन सिंदूरची एक घटना त्याला आठवली. भारतीय सैन्याने बहावलपुर येथे केलेल्या हल्ल्यामध्ये मसूद अझहरच्या कुटूंबातल्या १० सदस्यांचे तुकडे झाले, असे वक्तव्य त्यानी केले आहे.
सोशल मिडियावर एका व्हिडिओमध्ये पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या काही घटना आठवल्याचे दिसत आहे. जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मसूद इलियास काश्मिरी याने सांगितले की, आम्ही दहशतवादाला आलिंगन देत या देशाचे संरक्षण करण्यासाठी दिल्ली, काबुल आणि कंधारशी देखील लढलो. सर्व काही केल्यानंतर ७ मे २०२५ रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या बहावलपुर येथे हल्ला केला. हल्यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबाचे तुकडे सुद्धा केले. असे मसूद इलियास काश्मिरी याने हे सर्व उर्दूमध्ये सांगितले आहे.
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्यामध्ये भारताचे एकूण २६ लोक मारले गेले होते, त्यानंतर ७ मे २०२५ रोजी प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. या मोहिमेत पाकिस्तानच्या अनेक दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलांने बहावलपुरमध्ये हल्ला केला त्यावेळी मसूद अझहरच्या कुटूंबातील १० लोकांचा मृत्यू झाला.
मसूद अझहर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आहे आणि भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमागे त्याचा हात असल्याचे मानले जाते.