
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली तलवारबाजी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मागदर्शनाखाली ही स्पर्धा नुकतीच श्री वाणी विद्याशाला खडकपाडा कल्याण (प) येथे पार पडली.
सदर स्पर्धेचे उद्घाटन महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपआयुक्त संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. सदर तलवारबाजी स्पर्धेत १४,१७, व १९ या वयोगटातील एकूण १०० ते १५० मुले व मुली यांनी सहभाग नोंदवला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने तलवारबाजी ही स्पर्धा, इपी,फॉइल, व सेबर या तीन प्रकारात इलेक्ट्रॉनिक ऑपरेटर च्या माध्यमातून घेण्यात आल्या. सर्व विजेत्या स्पर्धकांना मेडल देऊन गौरविण्यात आले आहे. सदर स्पर्धा इलेक्ट्रॉनिक ऑपरेटर चा वापर करून घेण्यात आल्यामुळे क्रीडाशिक्षक व स्पर्धकांनी समाधान व्यक्त केले.
सदर समयी क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे क्रीडा पर्यवेक्षक प्रविण कांबळे, खेळप्रमुख गजानन वाघ, चिफ रेफ्री मंदार कुलकर्णी, डॉ. विजय सिंग, चिंतामण पाटील, भूषण जाधव, गणेश मोरे ,संतोष पाटील, तसेच सहभागी शाळांचे क्रीडा शिक्षक तसेच शिक्षण व क्रीडा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.