
नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासातली त्यांची घोषवाक्ये आणि उद्गार हे फक्त शब्द नव्हेत; ते लोकचळवळीचे साधन, राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आणि सांस्कृतिक प्रतिकात्मकतेचे वाहक ठरले आहेत.
साधेपणा आणि गहनता यांचा संगम साधत, त्यांनी भारतीय राजकीय संवादाची परिभाषाच बदलून टाकली. गुजरातमधील स्थानिक चैतन्यापासून ते पंतप्रधान म्हणून जागतिक मोहिमांपर्यंत – मोदींचे शब्द एका अशा नेत्याचा प्रवास दर्शवतात, ज्याने भाषेचे चळवळीत रूपांतरित केले.
त्यांच्या शैलीचे वैशिष्ट्य फक्त तिच्या आशयात नाही, तर लयीत आहे: छोटी वाक्ये, लक्षवेधी प्रतिमा आणि परंपरा व आधुनिकतेच्या तातडी यांचा मेळ. ते कधी संतांचे विचार उद्धृत करतात, तर कधी विशेष आर्थिक क्षेत्राचे आश्वासन देतात; कधी मातांचा उल्लेख करतात, तर कधी दहशतवादाविरुद्ध लढाईची घोषणा करतात. त्यांचे प्रत्येक वाक्य हे जणू वैयक्तिक ठामपणा आणि सामूहिक ध्येय यांचा संगम असतो.
एक नेता भाषेला शासनाचे साधन कसे बनवू शकतो, आणि साध्या शब्दांतून कोट्यवधी लोकांना एका दृष्टीकोनाभोवती एकत्र कसे आणू शकतो, हे त्यांच्या घोषवाक्यांनी आणि उद्धरणांनी दाखवून दिले आहे.
नम्रता आणि सेवा
आपल्या सार्वजनिक जीवनाच्या सुरुवातीपासूनच नरेंद्र मोदी यांनी स्वतःची ओळख शासक म्हणून नाही, तर लोकांचा सेवक म्हणून घडवली. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी गुजरातच्या जनतेला वारंवार सांगितले की आपला कार्यकाळ हा वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे नाही, तर लोकांच्या आशीर्वादामुळे आहे. त्यांनी सत्तेकडे "सेवा" म्हणून पाहिले आणि स्वतःला त्या सेवेचा रक्षक.
“यह तीन हजार दिन तक सेवा करने का अवसर नरेन्द्र मोदी के कारण नहीं है… यह जनता-जनार्दन के आशीर्वाद के कारण है।” (गरीब कल्याण मेला, जामनगर, २०१०)२०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतरही हीच दिशा कायम राहिली. पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात त्यांनी ‘प्रधान सेवक’ ही संज्ञा वापरुन स्वतःला ‘प्रधान मंत्री’ ऐवजी प्रत्येक नागरिकाचा सेवक म्हणून परिभाषित केलं. त्यातून, नेतृत्व म्हणजे प्रत्येक नागरिकाची सेवा या त्यांच्या तत्त्वज्ञानाचे दर्शन घडले.
“स्वच्छ भारत अभियान सरकार का कार्यक्रम नहीं है, यह जन आंदोलन है।” (लाल किल्ला, २०१४)त्याचप्रमाणे "स्वदेशी" आणि "व्होकल फॉर लोकल" यासाठी त्यांनी केलेले आवाहनही समाजात मोठ्या प्रमाणावर रुजले.
“एक ही मंत्र ‘Vocal for Local’, एक ही रास्ता ‘आत्मनिर्भर भारत’, एक ही लक्ष्य ‘विकसित भारत’।” (मन की बात, ऑगस्ट २०२५)शिक्षण प्रथमशिक्षण हा मोदी यांच्या भाषणांमध्ये एक सातत्याने उल्लेख केला जाणारा विषय आहे. त्यांनी नेहमीच शिक्षण हे गरिबी विरुद्धचे सर्वात मजबूत शस्त्र म्हणूनच संबोधले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना, मोदी यांनी विशेषतः महिला आणि ग्रामीण मुलांसाठी साक्षरता मोहिमांना सदैव प्रोत्साहन दिले, त्यांनी कायमच शिक्षणाला प्रतिष्ठा आणि सक्षमीकरणाचा पाया मानले आहे.
"गरीबी के सामने लड़ने का उत्तम हथियार शिक्षा है।" (जामनगर, २०१०)
शिक्षणाच्या ताकदीबदलच्या त्यांच्या याच विश्वासामुळेच तर, आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 सारखे महत्त्वाचे धोरण आणले. त्यांनी कायमच विद्यार्थ्यांना भारताच्या भविष्याचे शिल्पकार आणि नवीन भारताची इनक्यूबेटर्स मानले आहे. त्यांनी आपल्या भाषणांतून शिक्षणाला केवळ एक कल्याणकारी उपायोजना म्हणून मर्यादीत न राखता, त्याला राष्ट्रनिर्मितीच्या कार्यासोबत जोडले आहे.
"आज का विद्यार्थी ही २०४७ के भारत का निर्माता है।" (नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा प्रारंभ, २०२०)महिलांच्या नेतृत्वाखाली विकासआपल्या गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातही, नरेंद्र मोदी यांनी शासन व्यवस्थेत महिलांच्या एकसमान सहभागाला पाठबळ दिले होते. गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्याचा त्यांनी घेतलेला दूरदर्शी निर्णय म्हणजे महिला शक्तीवरील त्यांच्या अढळ विश्वासाचे, त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यामधले एक उदाहरण ठरले.
"महिलाओं को स्थानीय स्वराज में ५०% आरक्षण… पुरुषों जितना ही अधिकार महिलाओं का भी।" (वडोदरा, २०१०)त्यांनी यासंबंधीच्या चर्चांना राष्ट्रीय पातळीवर आणखी मोठी उंची गाठून दिली. बेटी बचाओ बेटी पढाओ संबंधी त्यांनी केलेल्या भाषणांमध्ये आणि संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर केले जात असतानाही, त्यांनी महिला वर्गाकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहिले नाही, तर त्या ही पलिक़डे त्यांनी विकासाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्या म्हणून महिला वर्गाचे महत्व अधोरेखित केले.
"नारी शक्ति हमारे हर प्रयास की अग्रदूत है।" (संसद, २०२३)तंत्रज्ञान आणि नवोन्मेषतंत्रज्ञानावरील मोदी यांच्या वक्तव्यातून भविष्यवेधी दृष्टीकोन आणि त्याच्याशी सुलभतेने जुळवून घेण्याचा विश्वास या दोन्ही पैलुंची प्रचिती येते. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून, त्यांनी भारतीय प्रतिभा अधिक माहिती तंत्रज्ञान अशा स्वरुपातच आयटी अर्थात माहिती तंत्रज्ञानाला भारताच्या भविष्यासाठीचे सूत्रच मानले होते. गुजरातमध्ये जगातील पहिल्या न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाची झालेली स्थापना हे त्यांच्या कारकि्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यातील तंत्रज्ञानाधारीत नेतृत्वाखालील शासनाचे एक ठोस प्रतीक बनले.
"I.T. + I.T. = I.T. — Indian Talent + Information Technology = India Tomorrow.” (२०१०)
पंतप्रधान म्हणून, त्यांची या विचाराला जागतिक पातळीपर्यंत पोहचवले. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, क्वांटम कंप्यूटिंग आणि अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातील भारताच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला. या अनुषंगानेच त्यांच्या भाषणांनी देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाला राष्ट्रीय अभिमान आणि व्यावहार्य शासन प्रशासनासोबत जोडले.
"आज का भारत AI, क्वांटम और स्पेस टेक्नोलॉजी में विश्व का नेतृत्व करेगा।" (इंडिया एआय मिशन, २०२४)लोकशाही आणि राष्ट्रनिष्ठापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धारणांमध्ये लोकशाही ही काही पाश्चात्त्य संकल्पना नाही, तर त्याऊलट ती भारतीय नागरी संस्कृतीची शक्ती आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना, त्यांनी वारंवार स्वातंत्र्यासाठी सतर्कता आवश्यक असल्याबाबत, आणि चुका सुधारण्याची क्षमता ही लोकशाहीची ताकद असल्याचे म्हटले होते.
"Eternal vigilance is the price of liberty… ये घटनाएँ हमें याद दिलाती हैं कि अधिकार छिन जाएँ तो क्या होता है।" (२०१०)त्यानंतर पंतप्रधान म्हणूनही, त्यांनी हा संदेश जागतिक पातळीवर पोहोचवला. भारतातील लोकशाही म्हणजे निव्वळ एक व्यवस्था नसून ही इथली जीवनशैली असल्याचे त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सभेत ठामपणे नमूद केले होते. त्यांनी नेहमीच आपल्या भाषणांमधून लोकशाही व्यवस्थेला भारताची नैतिक मार्गदर्शक आणि जगाला दिलेली सर्वात मोठी देगणी म्हणून मांडणी केली आहे.
"भारत में लोकतंत्र एक प्रणाली नहीं, यह जीवन शैली है।" (UNGA, २०१४)सुरक्षा आणि निर्धारभारतातील काही मोजकेच नेते राष्ट्रीय सुरक्षेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीं इतके थेटपणे बोलले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना, त्यांनी दहशतवादापुढे मान झुकवण्यास नकार दिला आणि कोणतीही तडजोड न करता लढण्याप्रति वचनबद्धता व्यक्त केली.
"मैं आतंकवाद के विरुद्ध अपनी लड़ाई छोड़ने वाला नहीं हूँ।" (राजकोट, २०१०)पंतप्रधान म्हणून, त्यांनी राष्ट्रीय तत्त्वज्ञानाअंतर्गत आपल्या निर्धाराला अधिकच धार दिली. बालाकोट हल्ल्यानंतर त्यांनी दिलेल्या थेट संदेशातून याची अवघ्या जगाला प्रचितीही आली. त्यांच्या शब्दांमध्ये प्रतिबंध आणि आव्हान दोन्ही दिसून येत होते आणि ते एका सशक्त सुरक्षाविषयक भूमिकेचेच प्रतिबिंब होते.
"घर में घुस कर मारेंगे।" (२०१९)ऑपरेशन सिंदूरनंतर, पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाने देशात देशभक्तीची लाट उसळली, आणि या भाषणाने दहशतवादाविरुद्धच्या लढाईकरता भारतासाठी न्यू नॉर्मल अर्थात एक नव्या सामान्य स्थितीची परिभाषा निश्चित केली.
"ऑपरेशन सिंदूर ने आतंक के खिलाफ लड़ाई में एक नई लकीर खींच दी है, एक नया पैमाना, न्यू नॉर्मल तय कर दिया है।"
“हम आतंक की सरपरस्त सरकार और आतंक के आकाओं को अलग-अलग नहीं देखेंगे”
“पानी और खून भी एक साथ नहीं बह सकता”
(मे, २०२५)संस्कृती म्हणजे आत्मविश्वास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सांस्कृतिक वारशाची आधुनिक काळातला भक्कम पाया म्हणून पुनर्रचना केली. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्य करताना त्यांनी राधाकृष्णनसारख्या व्यक्तींचा परंपरेला आधुनिक विचारांशी जोड दिल्याबद्दल गौरव केला.
“राधाकृष्णन जी ने भारत की संस्कृति के सार को समझ कर आधुनिक स्वरूप में विश्व के समक्ष रखा।”
(गांधीनगर, २०१०)
भारताकडे जी-20 चे यजमानपद असताना, झालेल्या जी -20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक व्यासपीठावर ‘वसुधैव कुटुंबकम’ या विषयावर भाषण केले आणि हा विषय वैश्विक बनवला. त्यांनी संस्कृतीचा वापर बचावात्मक पद्धतीने नाही; तर भारताची सॉफ्ट पॉवर अर्थात ‘सौम्य शक्ती’ म्हणून केला.
“भारत की संस्कृति में ‘वसुधैव कुटुम्बकम्’ का मंत्र है—यही हमारी G20 की आत्मा बनी।” (जी-20 शिखर परिषद, २०२३)प्रतिष्ठेसह विकास
गुजरातमध्ये, नरेंद्र मोदी अनेकदा लोकांना आठवण करून देत असत की , विकास हा विषय, काही सिमेंट आणि स्टीलबद्दल नाही, तर जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याबद्दल आहे : जलसंवर्धन, गृहनिर्माण आणि राहणीमानाचा दर्जा यातून विकास दिसला पाहिजे.
“મારા મન વિકાસ ઈંટ-ચૂનોની ઈમારત નથી… सामान्य मानवाच्या जीवनामध्ये गुणात्मक परिवर्तन घडून आले पाहिजे. ‘’ (२०१०)
पंतप्रधान म्हणून त्यांनी "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास" या घोषणेलाच मंत्रामध्ये रूपांतरित केले. त्यांच्या भाषणांमध्ये आर्थिक विकासाच्या केंद्रस्थानी गरीबांचा सन्मान हा मुद्दा असतो.
“सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’’ - यही हमारे विकास का सूत्र है।” (संसद, २०१९)
एकता आणि सामाजिक सौहार्दभारताची विविधता ही देशाची ताकद आहे, यावर नरेंद्र मोदी सातत्याने भर देतात. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जात आणि समुदायाच्या विभाजनाच्या पलीकडे जाणारा समाज, ‘समरस गुजरात’ची स्थापना करण्याचे आवाहन केले.
“समरस गुजरात का मंत्र लेकर हमें आगे बढ़ना है।”देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर , त्यांनी ही कल्पना संपूर्ण देशामध्ये पोहोचवली, अनेकदा भारताच्या सांस्कृतिक विविधेतला भोजन, खाद्यपदार्थांपासून ते सण-उत्सवांपर्यंत एकतेचा पाया म्हणून साजरे केले.
“भारत की विविधता ही भारत की एकता का सबसे बड़ा आधार है।” (लाल किल्ल्यावरील भाषणातून , २०२२)काही इतर भाषणातील अंश आणि घोषणा
पंतप्रधानपूर्व काळातील गाजलेल्या महत्त्वाच्या घोषणा
विकास ही समाधान है
• विकास हाच एकमेव उपाय
• २०१३ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या ‘एसआरसीसी’ भाषणात आणि गुजरातमध्ये प्रचार मोहिमेमध्ये हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर वापरला गेला.
• आर्थिक निकड आणि सांस्कृतिक अभिमानाची सांगड घालण्यासाठी आदर्श
ट्रिपल आयटी आयटी + आयटी = आयटी : भारतीय प्रतिभा + माहिती तंत्रज्ञान = उद्याचा भारत (२१ मार्च, २०१३)
‘गुगल+ हँगआउटद्वारे गुगल बिग टेंट’ कार्यक्रमात बोलताना, मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताचे भविष्य घडवण्यासाठी भारतीय प्रतिभा आणि माहिती तंत्रज्ञानाच्या परिवर्तनीय क्षमतेचे दर्शन घडवण्यासाठी "आयटी + आयटी = आय" हे सूत्र तयार केले. त्यांनी गुजरातमध्ये ‘होलोग्राफिक’ भाषणांपासून ते ई-व्होटिंग आणि नागरिक सेवा प्लॅटफॉर्मपर्यंत डिजिटल साधनांचा वापर अधोरेखित केला - तंत्रज्ञान-चालित प्रशासनात राज्याचे नेतृत्व करणारा नेता असा नावलौकिक मिळवला.
(भाषणाची लिंक -
https://deshgujarat.com/2013/03/21 /it-it-it-narendra-modi-at-google-big-tent/)
“पाकिस्तान जिस भाषा में समझे, समझाना चाहिए।” दहशतवादाविरुद्ध रॅली, मुंबई (१७ जुलै, २००६)
“पाकिस्तानला समजेल त्या भाषेत त्याच्याशी बोलले पाहिजे.”
संदर्भ : सीमेपलिकडून होणा-या दहशतवादी कारवायांना निर्णायक प्रतिसाद देण्याच्या भारताच्या अधिकाराविषयी घोषणा.
व्हिडिओ लिंक:
https://www.youtube.com/watch?v=SZQwy91riOo&ab_channel=BharatiyaJanataParty
देशाला कायदा नाही तर कृती केलेली हवी. Network 18 Think India Dialogue (२५ May २०१२)
"आम्हाला कायद्याची गरज नाही, कृतीची गरज आहे. केवळ सरकार बदल घडवून आणणार नाही – तर लोकच परिवर्तन घडवून आणतील."
संदर्भ: विकास आणि दायित्व, शासनाची तत्वे याविषयी कार्यक्रमामध्ये सहभागी होवून मोदी यांनी मांडलेले विचार
व्हिडिओ लिंक:
https://www.youtube.com/watch?v=GAyhWgthmpg&lc=Ugg50EthezvcE3gCoAEC&ab_channel=NarendraModi
शताब्दियों से हमारे देश में माँ का स्थान, नारी का स्थान सर्वोपरि माना गया है।
नवी दिल्ली येथे ‘फिक्की’च्या महिला संघटनेच्या २९ व्या वार्षिक सत्रामध्ये झालेल्या भाषणातून (८-४-२०१३)
‘’हम वादे नहीं , इरादे लेकर आये हैं ’ २० डिसेंबर, २०१३ , विजय शंखनाद रॅली वाराणसी
यूट्यूब लिंक –
https://www.youtube.com/watch?v=TQ1xFfm8kCw&ab_channel=AajTak
मैं देश नहीं झुकने दूंगा ऑक्टोबर, २०१३
भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक, दिल्ली. २१ फेब्रुवारी,२०१४https://www.youtube.com/watch?v=HZpb6f3pgw4&ab_channel=NarendraModi
संदर्भ: मजबूत नेतृत्व आणि राष्ट्रीय अभिमानाचा दावा; भ्रष्टाचारविरोधी आणि सार्वभौमत्वासाठी एक जोरदार घोषणाबाजी झाली.
‘’विकास भी, ईमान भी, गरीबोंका सन्मान भी’’ - ५ फेब्रुवारी, २०१४ , कोलकाता
https://www.youtube.com/watch?v=58mfTVi7FXo&ab_channel=BharatiyaJanataParty
शासक नही, सेवक १९ जानेवारी, २०१४
https://www.youtube.com/watch?v=Ck_KTfqDMaA&ab_channel=BharatiyaJanataParty