राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांचा वैयक्तिक कारणास्तव राजीनामा!

16 Sep 2025 14:56:20

राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांचा वैयक्तिक कारणास्तव राजीनामा!

मुंबई : (Maharashtra's Advocate General Birendra Saraf resigns) राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पुढील व्यवस्था होईपर्यंत काम पाहण्याची विनंती राज्य सरकारने त्यांना केली आहे. ती त्यांनी मान्य केली असून जानेवारीपर्यंत काम पाहण्यास होकार दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.१६) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली.

डॉ. बीरेंद्र सराफ हे भारतातील एक प्रमुख कायदेशीर तज्ज्ञ आहेत. ते मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील असून, २०२२ पासून महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता (Advocate General) म्हणून कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाकडून झाली होती, ज्याला तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली. २०२४ मध्ये महायुती सरकार स्थापन झाल्यानंतरही त्यांची नियुक्ती पदावर कायम ठेवण्यात आली होती.


Powered By Sangraha 9.0