हसणे गरजेचे आहे - नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाची विनोदी बाजू

16 Sep 2025 20:40:42

राजकारणात विनोदी हे एक शक्तिशाली साधनच असते. हे एक असे कलात्मक साधन आहे, जे तणाव कमी करू शकते, परस्पर संबंध वृद्धींगत करू शकते आणि सत्य उघड करू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी विनोद म्हणजे केवळ रंगरंगोटीचे साधन नाही, तर ते त्यांच्या नेतृत्वशैलीसोबत अतूटपणे विणला गेलेला एक चैतन्यमयी धागा आहे.

संसदेतील काव्यात्मक शैलीत आणि हुशारीने केलेला शब्दांचा वापर असो, गुजरातमधील सार्वजनिक सभांमधील उत्साहपूर्णतेने केलेला उपहास किंवा जागतिक व्यासपीठांवर ठळकपणे उठून दिसणार्‍या केलेल्या कोट्या असोत, त्यांची विनोदबुद्धी राजकीय संवादाला एक प्रकारचा जिव्हाळा आणि आपलेपणाचा स्पर्श देते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला हा विनोदी पैलू सदैव जागृत असतो. यातून हेच ठळकपणे दिसून येते की, सत्य जेव्हा हसतमुखाने मांडले जाते, तेव्हा ते अधिक खोलवर भिडते. ते आनंद देते, चिरकाल टिकून राहते. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत तर, विनोद हा हृदये आणि मन या दोघांना सांधणारा एकप्रकारचा दुवाच आहे.

गुजरातमधील कार्यकाळ : उपहास हेच शस्त्र आणि ढाल

नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्या विनोदाला अधिक धार आली. गर्दीने भरलेल्या सभांमध्ये, उपहासात्मक शैली हे एकप्रकारचे शक्तिशाली राजकीय साधन म्हणून विकसित झाले. काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेली आश्वासने तर त्यांच्यासाठी नमूनेच बनली. अनेकदा ती त्यांनी शोले या चित्रपटातील गब्बरच्या संवादाशी जोडली.

काँग्रेस के नेता ऐसे वादे करते हैं जैसे शोले का गब्बर - ‘अरे ओ सांभा, कितने वोट लाए?

हे पंतप्रधानांचे उपहासात्मक वक्तव्य त्याचेच उदाहरण.

लोककल्याणकारी योजनांचे प्रदर्शन मांडलेल्या गरीब कल्याण मेळ्यांमध्ये, पंतप्रधानांनी आपल्या टीकाकारांची उपहासात्मक शैलीत खिल्ली उडवली :

उनको गरीब कल्याण मेला पसंद नहीं, शायद वो गरीब रुलाओ मेला करना चाहते हैं.

आणि जेव्हा त्यांना विरोधकांच्या हल्ल्यांच्या माऱ्यापासून स्वतःचा बचाव कसा केलात याबाबत विचारले गेले, तेव्हा त्यांचे उत्तर पूर्णपणे देशी विनोदाच्या (स्ट्रीट विट) भाषेतच दिले :

मैं रोज २-३ किलो गाली खाता हूं, इसलिए मुझे कुछ होता नहीं.

हा विनोद इतका संस्मरणीय बनला की त्यांनी पंतप्रधान म्हणूनही अनेक वर्षांनंतर तोच पुन्हा वापरला.

व्हिडिओ पाहण्यासाठी दुवा : https://youtu.be/NrFb1Dhr6bI?feature=shared

विधानसभेच्या सभागृहात तर विनोद हे दुहेरी ढाल म्हणून कामी येते. ज्यावेळी विरोधी पक्षातील आमदारांनी त्यांच्यावर हुकूमशाहीचा आरोप केला, तेव्हा त्यांनी हजरजबाबीने प्रत्युत्तर दिले :

शायद आपको प्रॉब्लम है कि मैं आपकी तरह holiday CM नहीं हूं.

त्यांना उपहासाने प्रत्युत्तर देण्याची संधी मिळाली आणि त्याच वेळी लोकांचे मनोरंजनही करता आले.

पंतप्रधान पदाचा कार्यकळ : देशी विनोदापासून ते जागतिक कोट्यांपर्यंत

पंतप्रधान म्हणून, नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वातल्या विनोदी पैलूला एक मोठेच व्यासपीठ लाभले. संसद - जी बर्‍याचदा रणभूमी असल्यासारखी वाटते, ती संसद अनेकदा विनोद आणि कोट्यांचा आखाडा बनत असल्याचे चित्र आपल्याला दिसते. उदाहरण म्हणून मांडायचे झाले तर, राहुल गांधींनी यांनी २०१८ मध्ये डोळा मारण्याच्या घटनेबाबत बोलता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या कृतीची केलेली नक्कल हा अत्यंत विनोदाचा प्रसंग बनला, त्यांच्या या नकलेने खासदारांमध्येही हास्याचे धुमारे फुटले. खरे तर अशा प्रसंगाच्या वेळी पंतप्रधानांच्या विनोदातली त्या घटनेचे गांभीर्य कमी न करताही तणाव मात्र कमी करण्याची क्षमता ठळकपणे दिसून आली आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी दुवा : https://youtu.be/iAUbUZVt_Ws?feature=shared

संसदेतील कोट्या आणि राजकीय द्वंद्व प्रसिद्ध ट्युबलाईटचा पलटवार

फेब्रुवारी २०२० मध्ये लोकसभेतील एका चर्चेदरम्यान एक न विसरता येण्यासारखा वाद प्रतिवाद झाला हेता. त्यावेळी राहुल गांधी यांनी, सहा महिन्यांत युवा वर्ग मोदी यांना लाठ्याकाठ्यांनी मारझोड करेल असे विधान केले होते. ल्यानंतर, पंतप्रधान मोदी यांनीही कधीही विसरता येणार नाही असा पलटवार करणारे उत्तर दिले होते, त्यांच्या या उत्तराने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

राहुल गांधींनी एका जाहीर सभेत विधान केले होते की : नरेंद्र मोदी जे आता भाषणे देत आहेत, ते सहा सात महिन्यांत घराबाहेर पडू शकणार नाहीत. भारताचा युवा वर्ग त्यांना लाठ्याकाठ्यांनी मारझोड करेल .

आणि अखेर ज्यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या ३०-४० मिनिटांच्या भाषणात व्यत्यय आणला, तेव्हा पंतप्रधानांनी त्यांना उध्वस्त करणार्‍या विनोदी शैलीत हल्ला केला :

मी ३०-४० मिनिटांपासून बोलत आहे पण आता करंट पोहोचला . बहुत से ट्युबलाईट ऐसी ही होते है.

त्यांच्या या विधानावर भाजपाच्या सदस्यांमध्ये तर हास्याचा स्फोटच झाला आणि त्यांंनी आनंदाच्या भरात आपली बाके वाजवली.

त्यानंतरही मोदी यांनी उपहास करत म्हटले की, ते गांधींनी दिलेल्या मारहाणीच्या धमकीसाठीही तयारी करतील :

माझी पाठ मार खाण्यासाठी तयार व्हावी यासाठी मी आणखी सूर्यनमस्कार घालेन... मी स्वतःला शिवीगाळीपासून सुरक्षित (गाली-प्रूफ) आणि काठ्यांपासून सुरक्षित (डंडा-प्रूफ) बनवेन. खरे तर मला आगाऊ सूचना दिल्याबद्दल मी आभारी आहे."

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी हे वारंवार आणत असलेल्या व्यत्ययांबद्दल मोदींनी एकदा विनोद केला होता आणि म्हटले होते की ते "सतत त्यांच्या जागेवरून उठून संसदेत 'फिट इंडिया' मोहिमेचा प्रचार करत आहेत".

त्याचप्रमाणे, बेरोजगारीवरील टीकेला उत्तर देताना मोदींनी उपहासाने म्हटले होते: "मी देशातील बेरोजगारी दूर करेन पण त्यांची [विरोधी पक्षाची] बेरोजगारी दूर करणार नाही".

पुन्हा एकदा संसदीय रत्न म्हणून आपली बुद्धिमत्ता दाखवत मोदींनी टीकाकारांना सांगितले: "जर मी तुम्हाला मुद्देसूद उत्तरे देऊ लागलो तर मी गूगल सर्चसारखा होईन," हे ऐकून सर्व पक्षांच्या खासदारांमध्ये हशा पिकला.

तरुणांसोबत हास्यविनोद


विद्यार्थ्यांसोबतचे त्यांचे विनोद लोकप्रिय संस्कृतीत गणले जाऊ लागले आहेत. "PUBG वाला है क्या?" या उत्स्फूर्तपणे विचारलेल्या प्रश्नाचे एक मीम बनले, जे तरुणांच्या वाक्प्रचाराचे, बोलण्याचे त्यांचे कौशल्य प्रतिबिंबित करते.

Video: https://www.youtube.com/watch?v=bArL0nZJqcw


नंतर, गेमर्सकडून "नूब" हा शब्द शिकत असताना ते विचारते झाले: "तो मैं भी नूब हूॅं क्या?" - एक महान नेता क्षणार्धात समवयस्क बनला.

Video: https://www.youtube.com/shorts/HM3kYeluLT8

अवखळपणाने राजनैतिक कूटनीति

जागतिक पातळीवर विनोद देखील एक राजनैतिक साधन बनले. मोदींनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांना हसून प्रश्न केला, "आजकाल तुम्ही ट्विटरवर भांडत आहात काय ?”

Video: https://youtube.com/shorts/C9HOfWFt6qU?feature=shared

कॅरिबियन क्रिकेटपटू ख्रिस गेल आणि डॅरेन सॅमी यांच्यासोबत त्यांनी षटकार मारणे आणि नृत्याच्या हालचाली यावर विनोदी टिप्पणी केली. या क्षणांमध्ये जणू राजनैतिकता आणि खेळकरपणा यांची भेट झाली.

Video:
https://www.youtube.com/shorts/EkkmnPTapB4

तणाव दूर सारताना

एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमादरम्यान, इंग्रजी आणि हिंदीमध्ये बदल करताना अनुवादकाचा गोंधळ उडाला. परंतु त्यावर कावरेबावरे होऊ न देता मोदी लगेच हसले आणि म्हणाले: "काळजी करू नका, आपण भाषा मिसळू शकतो.”

निर्माते आणि लोकांसह

राष्ट्रीय क्रिएटर्स पुरस्कार समारंभात त्यांनी दालनात चेष्टेचा सूर लावला. "चलिये, मूड तो हर एक के बहोत होते है भाई."
मस्करीत त्यांनी मायक्रोफोन मागितला: “ माईक देदीजिए, काम आएगा.”

Video: https://www.youtube.com/watch?v=Mk0YAvIOZU0


निःशस्त्रीकरणासाठी बुद्धीचा वापर

त्यांच्या काही अत्यंत कटू टीका या विनोदात संकुचित केल्या गेल्या आहेत. 2014 च्या प्रचारादरम्यान, त्यांनी काँग्रेसच्या घसरणीची खिल्ली उडवली: "400 से 40 हो गये.”

Video : https://www.youtube.com/shorts/vsEQLR7Sp_s

पाकिस्तानबाबत : "उनके लिए झंडे पे चांद है, मेरे लिए चांद पे झंडा हो.”

Video : https://youtube.com/shorts/HOsMCG2fmL0?feature=shared

२०१७ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरील त्यांच्या वक्तव्यामुळे - "त्यांना रेनकोट घालून बाथरूममध्ये आंघोळ करण्याची कला अवगत होती" - मोठा गदारोळ उडाला.

विनोदांनी भारताचे नाव ठसविणे

जागतिक प्रेक्षकांना संबोधित करताना मोदी अनेकदा भारताचे परिवर्तन संस्मरणीय बनवण्यासाठी बुद्धिमत्तेचा वापर करत असत.

२०१४ साली मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये त्यांनी एका विनोदाने रूढीवादी कल्पनांना उलथवून टाकले:

"आपले पूर्वज सापांशी खेळत असत; आज आपले लोक उंदराशी (माऊस )खेळत आहेत."

प्रेक्षकांनी या ओळीवर टाळ्यांचा कडकडाट केला - यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. एकेकाळी गूढ लोकांची भूमी म्हणून कल्पिला जाणारा भारत आता आयटी कौशल्याचे केंद्र म्हणून पुन्हा साकारला गेला आहे.

त्याच अमेरिकेच्या दौऱ्यात भारताच्या मंगळ मोहिमेबद्दल बोलताना त्यांनी अंतराळ विज्ञानाची तुलना दररोजच्या ऑटो भाड्यांशी केली:

"अहमदाबादमध्ये, तुम्हाला ऑटोने एक किलोमीटर प्रवास करण्यासाठी 10 रुपये खर्च येतात. आम्ही फक्त 7 रुपये प्रति किलोमीटर दराने मंगळापर्यंत 65 कोटी किलोमीटर प्रवास केला.”

थोडक्यात, मोदींचे विनोद सामान्य लोकांना लगेच ओळखता येणाऱ्या सांस्कृतिक संदर्भांमध्ये रुजलेले आहेत - क्रिकेट, सिनेमा, म्हणी आणि अगदी ऑनलाइन गेमिंगच्या शिवराळ भाषा. हे स्पर्शबिंदू सुनिश्चित करतात की त्यांचे विनोद पिढ्यानुपिढ्या प्रतिध्वनीत होतील.

त्याच वेळी, विनोद एक नि:शस्त्रीकरणाचे साधन म्हणून काम करतो, शत्रुत्व कमी करतो आणि राजकीय देवाणघेवाणीमधील वाद कमी करतो, त्याची दृढता कधीही कमी न करता. दीर्घ वादविवाद बहुतेकदा मथळे, मीम्स आणि व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स म्हणून विकसित होणाऱ्या आकर्षक वाक्यांशांमध्ये मोडतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा विनोद त्यांच्या नेतृत्वाला मानवीय बनवतो: जेव्हा ते दररोज "२-३ किलो गाली खाण्याबद्दल" विनोद करतात किंवा स्वतःला "नूब " म्हणतात, तेव्हा ते उच्चपदाची दरी कमी करतात आणि समविचारी वाटतात, सत्तेचा भार वाहूनही स्वतःवर हसण्यास सक्षम असतात.‌

राजकारणामध्ये हास्य दुर्मिळ आहे, पण जेव्हा ते येते तेव्हा ते भाषणापेक्षाही अधिक शक्तिशाली असू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा दाखवून दिले आहे की विनोदाची तीक्ष्ण भावना विरोधकांना नि:शस्त्र करू शकते, मने जिंकू शकते आणि सर्वात अनपेक्षित मार्गाने सत्य मांडू शकते. त्यांची एकच विनोदी ओळ, खेळकर विनोद आणि हलकेफुलके क्षण आपल्याला आठवण करून देतात की राजकारणाच्या धगीतही हंसना जरूरी है.

Powered By Sangraha 9.0