डोंबिवली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विवेकानंद वस्ती, बाजीप्रभू नगर, व. ना.पाटकर ट्रस्ट आणि अभ्युदय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ठाकुर्ली पूर्व येथील मारुती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन रविवार दि. १४ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. या शिबिरात ५० महिला तर १९ पुरुषांनी प्रत्यक्ष तपासणी करून घेतली. अजय चौधरी यांनी हॉस्पिटल ची जागा या शिबिरास मोफत उपलब्ध करून दिली.
या शिबिरासाठी मुंबईहुन इंडियन कॅन्सर सोसायटी चे डॉ. प्राची पाटेकर, डॉ. एन के वासवानी, डॉ. विभूषा रोहिदास आणि त्यांची टीम उपस्थित होती. विवेकानंद वस्तीत हा कार्यक्रम घेण्यासाठी पद्मश्री गजानन माने, गिरीश दीक्षित आणि विजया बोडस यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली सेवा भारतीचे बाळकृष्ण धोंड, सेवक विशे, दिलीप पाध्ये, अभय बेहरे, प्रसाद गुप्ते, खुशबू चौधरी,साधना विसपुते, पूनम पाटील, स्मिता कवडे, श्रुती उरणकर, मृदुला कुलकर्णी, अपर्णा घाडी उपस्थित होत्या.
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आशीर्वाद बोंद्रे, अभ्युदय प्रतिष्ठान डॉ. प्राची पाटेकर, डॉ तुषार वानरकर, डॉ तेजस्वी वानरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी बोंद्रे यांनी अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन शहरात विविध ठिकाणी झाले पाहिजे असल्याचे मत व्यक्त केले.