हवेली : सोमवारी दि.१५ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता हवेली तालुक्यातील थेऊर गावातील रूपे वस्ती परिसरात ओढ्याला आलेल्या पुरामुळे जवळपास १५० लोकांच्या वस्तीत पाणी भरले आणि अंदाजे १०० लोक अडकले होते. याची माहिती मिळताच 'पीएमआरडीए'च्या वाघोली अग्निशमन केंद्रातील जवान आणि 'पीडीआरफ' पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने समन्वित कारवाई करत घरांमध्ये अडकलेल्या ७० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले.
यावेळी म्हशी, शेळ्या, कोंबड्या आदी पाळीव प्राणी काही प्रमाणात वाचवण्यात आले, तर काही प्राणी वाहून गेले आणि काहींचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र, मानवी जीवितहानी झालेली नाही.
पीएमआरडीए व पीडीआरएफ बचाव पथकाच्या तत्पर मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.