मुंबई : मुखेड येथून प्रकाशित होणाऱ्या लोकसंकेत दिवाळी विशेषांक साठी कथा, कविता, विशेष माहिती, ललित व विविध लेख मागविण्यात येत आहेत. साहित्यिक, कवी, लेखक, विद्यार्थ्यी सोबतच साहित्याची आवड असलेल्यांनासाठी लोकसंकेत दिवाळी विशेषांक साहित्य पाठवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
सदर साहित्य हे पूर्णता स्वतःचे असावे. साहित्य व्याकरणाच्या दृष्टीने अचूक असावे. कविता ही वीस ओळींच्या आत असावी. कथा ५०० ते ७०० शब्दांच्या वर नसावी. शिवाय ललित व इतर लेख ६०० शब्दांचे असने अनिर्वाय आहे.
साहित्य पाठवताना लेखकांनी त्यांच्या पासपोर्ट साईझ फोटोसह आपले साहित्य ई-मेलद्वारे lokdiwali2025@gmail.com या पत्त्यावर २० सप्टेंबर २०२५ पर्यंत पाठवावे. त्यानंतर आलेले साहित्य स्वीकारले जाणार नाही. त्याबरोवरच साहित्य प्रकाशित करण्याचा अंतिम निर्णय हा संपादकांचा राहील.