
मुंबई : मीरा रोडच्या नयानगर परिसरातील हिंदू व्यक्तीच्या दुकानावर धर्मांधांनी बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मीरा रोड पोलीस ठाण्यात यासंबंधित नुकतीच एक तक्रार दाखल झाली असून नोंदवलेल्या तक्रारीत मालकाला शिवीगाळ-धमक्या देत त्याला मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अशी माहिती आहे की, ही जागा हिंदू व्यक्तीने मुस्लिम परिवारास भाडेतत्वावर राहण्यासाठी दिले होते. मात्र आता ते जागा सोडण्यास तयार नाहीत.
तक्रारदार त्रुप्ती अभिषेक तिवारी यांनी म्हटले की, या दुकानांमध्ये मुलांसाठी शाळा सुरू करण्याचा विचार होता. ही दोन्ही दुकाने यापूर्वी इस्माईल इमरानला भाड्याने दिली होती. आम्ही शाळा सुरू करण्याचा बेत आखल्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच भाडेकरार संपवण्यात आला. सध्या या ठिकाणी आमचा फर्निचर व्यवसाय सुरू आहे. त्या दुकानात जाण्यासाठी जिन्याद्वारे स्वतंत्र प्रवेश आहे. त्या जिन्याखाली सोसायटीचे मीटर रूम आहे. त्या ठिकाणाहून इमरानने बेकायदेशीरपणे मीटर रूमची भिंत फोडून मागच्या बाजूस जाण्यासाठी रस्ता तयार केला आणि झोपडपट्टीतील मोकळ्या जागेवर कब्जा करून अनधिकृत जिम उभारले आहे.”
मिळालेल्या माहितीनुसार, घरमालक अभिषेक जेव्हा आपल्या जागेची पाहणी करण्यासाठी गेले तेव्हा इमरानच्या कुटुंबीयांनी अभिषेक यांच्यावर लोखंडी रॉड, प्लास्टिक पाईप आणि लाकडी साधनांनी हल्ला केला. इमरानचा भाऊ नदीम आणि इतरांनीही मिळून निर्दयपणे मारहाण केली. तक्रारीत असेही नमूद केले आहे की आरोपींनी जीवघेण्या धमक्या दिल्या आणि बेकायदेशीर टोळी तयार करून छळ केला. या परिसरातील नयानगर मुस्लिमबहुल असल्याने तेथे हिंदू विरुद्ध प्रतिकूल वातावरण निर्माण झाल्याचा अनुभव होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सदर प्रकरणी सर्व आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता अन्वये कलम १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११५(२), आणि ११८(२) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.