एसआरए सर्व्हेक्षणात आता जीआयएस प्रणाली

13 Sep 2025 19:49:20

मुंबई, ESRI India User Conference २०२५ ही बहुचर्चित परिषद शुक्रवार, दि. १२ सप्टेंबर रोजी मुंबईत पार पडली. या परिषदेत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई कार्यालयाने सक्रीय सहभाग नोंदविला. यात जीआयएस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शहरी पुनर्वसनातील पारदर्शकता, कार्यक्षमता व गती कशाप्रकारे साधता येते यावर माहिती देण्यात आली.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई कार्यालयाच्या वतीने झोपडपट्टी नकाशांकन व डेटा व्यवस्थापनासाठी वापर, पुनर्वसन प्रकल्पांचे नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेख सुलभ करणारी प्रणाली, लाभार्थींच्या माहितीचे डिजिटलायझेशन व लोकेशन-बेस्ड ट्रॅकिंग तसेच प्रकल्पांमधील पारदर्शकता व जबाबदारी सुनिश्चित करणारे तांत्रिक उपाय या मुद्द्यांवर परिषदेमध्ये GIS-आधारित युनिक मॉडेल प्रणाली सादर करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0