‘विधिवत’ निर्मूलनाची नांदी

13 Sep 2025 12:09:54

नुकताच आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. गणेशोत्सवानंतर बर्‍याच ठिकाणी गणेशमूर्तींचे संकलन, पुनर्वापर ही मोहीम राबविली जाते. पण, आपल्या दैनंदिन जीवनात पूजेत वापरात नसलेल्या किंवा भंगलेल्या, देवी-देवतांच्या, राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे नेमके करायचे तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण, या प्रतिमा निर्माल्यात अथवा कचर्‍यात फेकवत नाही की, उघड्यावर टाकून त्या प्रतिमांचा अपमानही होऊ नये, अशीही एक भावना असते. मग अशा वस्तूंची अडगळ होऊन जाते. या समस्येवरच उपाय म्हणून ‘परिवर्तन भारती’ या संस्थेच्या माध्यमातून ‘विधिवत’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा जन्म झाला. एकेठिकाणी जमा केलेल्या मूर्ती, फ्रेम्स यांची ‘विधिवत’ उत्तरपूजा करत, आवश्यक आणि शय होईल, त्या गोष्टींचा पुनर्वापर करत, निर्मूलनाची प्रक्रिया सुटसुटीत केली जाते. आज दि. १३ सप्टेंबर रोजी मुंबईतील विलेपार्ले येथील उत्कर्ष मंडळ येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ‘विधिवत’च्या याच उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा आढावा घेणारा लेख...

भारतीय संस्कृतीविश्वात सण-वार आणि उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व. वेगवेगळ्या सणांच्या माध्यमातून समाजमन जोडण्याचे, माणसाचं जीवन समृद्ध करण्याचा असा हा अभिनव सोहळाच. कालौघात आपल्या सण- उत्सवांचे रुप बदलले आणि त्यातून येणार्‍या पिढ्यांनी आपल्या उत्कर्षासाठी अनेक नव्या गोष्टी स्वीकारल्या व चुकीच्या रुढी-प्रथांना मूठमाती दिली. परिवर्तनाचा हा अविष्कार साकारणं, जास्तीत जास्त लोकांना परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेणं, हे आपल्या सनातन धर्माचे केवळ वैशिष्ट्य नसून, तर ते बलस्थानसुद्धा आहे. सण-उत्सवांचा विचार करायचा झाल्यास, हा प्रत्येकासाठी आनंदाचा सोहळा आणि समाजाला नवचैतन्य प्रदान करणार उत्सव असतो.

आपल्या सणांचे, उत्सवांचे अवलोकन करण्याचे कामसुद्धा आपल्या समाजातील काही लोक करतात, ज्यामुळे या उत्सवातील सत्त्व तर टिकून राहतेच; परंतु नवनिर्मितीसाठी, सृजनासाठी नवे अवकाशसुद्धा खुले होते. याच अवलोकनामुळे लोक पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतात, ज्यामध्ये शाडूची मूर्ती, पर्यावरणपूरक आरास आदींचा समावेश असतो.

आपल्या घरात धार्मिक विधी करताना, कित्येक वस्तू उदाहरणार्थ पूजेत वापरात नसलेल्या किंवा भंगलेल्या देवी-देवतांच्या राष्ट्रपुरुषांच्या, पूर्वजांच्या मूर्त्या किंवा तस्बीरी असतात, ज्यांचं काय करायचं, हे आपल्या लक्षातच येत नाही. एकप्रकारे हा विषय हाताळणं आपल्याला जड जातं. हीच समस्या केंद्रस्थानी ठेवून रोहित फडणीस व त्यांच्या सहकार्‍यांनी एक नवीन उपक्रम हाती घेतला. २०२४च्या जानेवारी महिन्यात त्यांना भगवान शंकराची मूर्ती एका ठिकाणी भग्नावस्थेत सापडली. कुठल्यातरी भाविकाने त्याच्या घरची मूर्ती, काही कारणास्तव अशी बाहेर ठेवली असावी. मात्र, ही समस्या भौगोलिकदृष्ट्या केवळ त्या स्थानापुरतीच मर्यादित नव्हती. जुन्या मूर्त्यांचे, धार्मिक वस्तूंचे काय करायचे, हा प्रश्न आजही अनेकांना भेडसावतो. रोहित फडणीस व त्यांच्या चमूने असा विचार केला की, या आणि अशा अनेक धार्मिक वस्तूंची विधिवत उत्तरपूजा करावी, यातील ज्या वस्तूंचा पुनर्वापर शय असेल, त्या त्या वस्तूंचे संकलन करावे व ीशलूलश्रळपसच्या प्रक्रियेतून वेगळ्या पद्धतीने त्याचा वापर व्हावा आणि निरुपयोगी गोष्टींचे यथोचित निर्मूलन व्हावे, असा विचार यामागे होता. त्यांच्या या कार्याला हिंदू बांधवांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला. सुरुवातीला १०० घरांपासून त्यांनी ही आगळीवेगळी मोहीम सुरू केली आणि अल्पावधीतच समाजमाध्यमांमुळे हा उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला. ‘परिवर्तन भारतीय लिमिटेड’ या संस्थेच्या माध्यमातून ‘विधिवत’ या उपक्रमाने अनेकांना वाट दाखवली.

ही प्रक्रिया राबवत असताना त्याला आवश्यक ते मनुष्यबळ, आर्थिक बळ, संकलन आणि निर्मूलनाची सामग्री तथा प्रक्रिया यांसाठी माणसं, वेळ आणि पैसा या तिन्ही गोष्टींची आवश्यकता होती. म्हणूनच ही प्रक्रिया राबवताना सदर मोहीम सशुल्क करून, एक अत्यंत जबाबदार प्रयोग ‘विधिवत’च्या माध्यमातून यशस्वी होताना आपल्याला बघायला मिळाला. सुयोग्य तथा सृजनात्मक गोष्टींच्या पाठीशी सज्जनशक्तीचे बळ कायमच असते. ज्येष्ठ पंचांगकर्ते मोहन दाते यांनीदेखील या उपक्रमाचे कौतुक केले. दगडाच्या मूर्ती, प्लास्टिकच्या फ्रेम, लाकडी देवघर अशा असंख्य वस्तूंचे विधिवत निर्मूलन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले. एका बाजूला संस्था जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते, पण दुसर्‍या बाजूला लोकसुद्धा स्वतःहून या उपक्रमामध्ये सहभागी होतात.

अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमांमध्ये आपल्याला आपल्याच देवी-देवतांच्या, धार्मिक प्रतिमांचे झालेले भंजन बघतो. काही ठिकाणी जाणीवपूर्वक अशा पद्धतीचा संदेश पाठवला जातो, तर काही वेळेला खरोखरच अनवधानाने भाविकांच्या हातून चूक झालेली असते. ही चूक टाळण्यासाठी, धार्मिक गोष्टींची साधनशुचिता पाळण्यासाठी ‘विधिवत’सारखा उपक्रम किती आवश्यक आहे, याची आपल्याला प्रचिती येते.

‘विधिवत’च्या कार्याचे महत्त्व हे सामाजिक बांधिलकीच्या अनुषंगानेदेखील समजून घेणे आवश्यक आहे. एका राष्ट्राचे जबाबदार नागरिक म्हणून आपण आपल्या समाजजीवनामध्ये काही कर्तव्य पार पाडणे आवश्यक असते. यातील काही कर्तव्ये ही अलिखित तरी आवश्यक असतात, जी समस्या आपल्या सगळ्यांच्याच जीवनाचा भाग होती, त्यावर अशा पद्धतीने काम करणारी संस्था आणि त्यातील माणसं ही खर्‍या अर्थाने राष्ट्रविचारांचे, संविधानिक आदर्शांचे वाहक असतात, असेच म्हणावे लागेल.

लोकभावनेचा विचार करत कार्यपूर्ती

आपल्या घरातील धार्मिक वस्तू, मग भलेही त्या जुन्या झाल्या असतील, त्यांच्यासोबत आपलं एक भावनिक नातं तयार झालेलं असतं. परंतु, कालपरत्वे त्या वस्तूंचं निर्मूलन होणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं. हा विचार मनात ठेवून, लोकभावनेचा सन्मान राखत ‘विधिवत’ हा उपक्रम जन्माला आला, ज्याअंतर्गत आपण अशा धार्मिक वस्तूंची उत्तरपूजा करून त्यांचे ‘विधिवत’ निर्मूलन शय होईल. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक तर केलेच, परंतु लोकांचादेखील या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. येणार्‍या काळात वेगवेगळ्या महानगरांमध्ये, शहरांमध्ये आम्ही ही मोहीम राबविणार आहोत.
- रोहित फडणीस, संस्थापक - विधिवत

पर्यावरणाचा विचार व्हायलाच हवा!

‘विधिवत’सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणाचा विचार सर्वप्रथम केला जातो. समाज म्हणून आपल्याला ‘विधिवत’सारख्या प्रयोगाची आज गरज आहे, जिथे भंगलेल्या मूर्ती, वापरात नसलेली धार्मिक वस्तू यांचे काय करायचे, हा प्रश्न लोकांना पडलेला असतो. आपल्या परिसरामध्ये चुकीच्या पद्धतीने इकडे-तिकडे गोष्टी टाकून देण्यापेक्षा, योग्य त्या पद्धतीने त्यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया जी आपण सुरू केली आहे, त्यामुळे समाजाच फायदा होत आहे.
- मनोज मसुरकर, संयोजक - विधिवत

९९६७८२६९८३
(विधिवत उपक्रमाविषयी अधिक माहितीसाठी संपर्क -९४२२५९४२१५/ ९८१९४२१८५८)

Powered By Sangraha 9.0