भारत-अमेरिका व्यापार कराराचा पहिला टप्पा नोव्हेंबरपर्यंत पूर्णत्वास - केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

11 Sep 2025 15:34:43

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यातील बहुचर्चित व्यापार कराराचा पहिला टप्पा नोव्हेंबर २०२५ पर्यंत अंतिम केला जाईल, असे संकेत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी दिले आहेत.

पटना येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गोयल म्हणाले, फेब्रुवारी २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट निर्देश दिले होते की, दोन्ही देशांचे मंत्री मिळून नोव्हेंबर २०२५ पर्यंत एक सक्षम आणि चांगला व्यापार करार तयार करावा. या कराराचा पहिला भाग, नोव्हेंबर २०२५ पर्यंत निश्चित व्हायला हवा. मार्चपासून या विषयावर गंभीर चर्चासत्रे सुरू आहेत. या चर्चेचे वातावरण अत्यंत सकारात्मक असून प्रगतीही समाधानकारक आहे. दोन्ही बाजूंना या प्रगतीबद्दल समाधान आहे.

भारत-अमेरिका व्यापार कराराच्या वाटाघाटीला २०२५ च्या सुरुवातीपासून गती मिळाली आहे. या कराराचा उद्देश म्हणजे परस्पर व्यापारातील अडथळे कमी करून गुंतवणूक आणि उद्योगांना चालना देणे हा आहे.


Powered By Sangraha 9.0