महत्वाची बातमी! गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी

11 Sep 2025 19:36:34

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर पदाचा राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रपतींनी नवा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, आचार्य देवव्रत हे त्यांच्या मूळ कार्याबरोबरच महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारीही सांभाळणार आहेत.


Powered By Sangraha 9.0