कोण आहेत डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क? ज्यांची झाली गोळ्या झाडून हत्या!

11 Sep 2025 12:20:39

वॉशिंग्टन: (Charlie Kirk Shot Dead) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते ३१ वर्षीय चार्ली कर्क यांची गुरूवारी युटा व्हॅली विद्यापीठात गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

'द अमेरिकन कमबॅक' आणि 'प्रूव्ह मी राँग' अशा घोषणांनी रंगविलेल्या तंबूमध्ये विद्यार्थ्यांसमोर भाषण करत असताना कर्क यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मानेला गोळी लागल्यामुळे कर्क यांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतरचा थरकाप उडवणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विद्यार्थी घाबरून सैरावैरा पळताना दिसत आहेत. जमिनीवर कोसळलेले कर्क मानेला घट्ट पकडून बसल्याचे दिसत आहे.

कर्क यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी रविवारपर्यंत अमेरिकेचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस यंत्रणांनी अद्याप मारेकरी यांच्याबाबतची कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. सोशल मीडिया प्ल्रठफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटले, "आपण सर्वांनी चार्ली कर्कसाठी प्रार्थना केली पाहिजे. तो एक उत्तम माणूस होता. त्याच्या आत्म्याला शांती मिळो."




Powered By Sangraha 9.0