महारेराचा बाधित घर खरेदीदारांना दिलासा ; महारेराने ५२६७ तक्रारी काढल्या निकाली

10 Sep 2025 18:03:35

मुंबई, महारेराने ऑक्टोबर २०२४ ते जुलै २०२५या दरम्यान घर खरेदीदार ग्राहकांच्या विविध तक्रारींबाबत तब्बल ५२६७ तक्रारी निकाली काढल्या आहेत. एवढेच नाही तर महारेराकडे जुलै अखेरपर्यंत दाखल झालेल्या घर खरेदीदारांच्या तक्रारींची पहिली सुनावणीही झाली किंवा त्यातल्या काहींच्या सुनावणीसाठीच्या तारखाही निश्चित करण्यात आल्या आहेत.

घरखरेदीदार आयुष्याची कमाई गुंतवून घर नोंदवतो. परंतु काही कारणाने आश्वासित वेळेत ताबा मिळाला नाही ,गुणवत्ता बरोबर नाही , घर खरेदी करारात मान्य केलेल्या सोयी सवलती आणि इतरही काही बाबी नाहीत, अशा स्वरूपाच्या अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते. या घरखरेदीदारांच्या न्यायोचित हितांचे रक्षण करण्याची जबाबदारी महारेराची आहे. त्यामुळे महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या तक्रारींची नोंद वेळच्यावेळी घेतल्या जावी . न्याय्य दिलासा दिला जावा, यासाठी महारेराचे अध्यक्ष मनोज सैनिक यांनी तक्रारींबाबत सुनावण्यांची गती वाढविण्याचे नियोजन केले.

त्यांच्या या नियोजनाला यश येऊन इतके दिवस अनेक कालावधीसाठी प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्याचा सपाटा महरेराने लावला आहे. ऑक्टोबर २०२४ ते जुलै २०२५ या काळात या तिघांनी तब्बल ५२६७ तक्रारींबाबत यथोचित निर्णय घेऊन घर खरेदीदारांना मोठ्या प्रमाणात दिलासा दिला . प्रत्यक्षात या काळात ३७४३ तक्रारी दाखल झालेल्या होत्या. तक्रारी दाखल झाल्यानंतर महिन्या दोन महिन्यात त्याची नोंद घेऊन सुनावणी होण्याची चांगली स्थिती महारेरामधे आता पहिल्यांदाच निर्माण झालेली आहे.
Powered By Sangraha 9.0