काठमांडू : नेपाळमध्ये जनरेशन झेडचे प्राणघातक आंदोलन सुरू असतानाच, नेपाळमधील एका शालेय विद्यार्थ्याच्या ज्वलंत भाषणाचा जुना व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या विद्यार्थ्याचे नाव ओरा असून हा व्हिडिओ त्याच्या शालेय वार्षिक कार्यक्रमादरम्यान रेकॉर्ड करण्यात आला होता.
व्हायरल व्हिडिओमध्ये, ओरा आशा आणि निश्चयाने भरलेल्या स्वरात भाषणाला सुरूवात करतो. "आज मी येथे एका नवीन नेपाळचे स्वप्न घेऊन उभा आहे. परंतु माझे हृदय जड आहे कारण हे स्वप्न निसटत चालले आहे," तो म्हणतो.
पुढे तो म्हणतो, "नेपाळ आमची आई आहे" , आम्हाला जन्म देणारा आणि आमचे पालनपोषण करणारा देश आहे. त्याने त्या बदल्यात काय मागितले? फक्त आमची प्रामाणिकता, आमचे कठोर परिश्रम, आमचे योगदान. पण आम्ही काय करत आहोत?"
त्यानंतर ओरा देशात सतत उद्भवणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकत. राजकीय अस्थिरता, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या विषयांवर बोलतो."आपण बेरोजगारीच्या साखळ्यांनी बांधलेले आहोत, राजकीय पक्षांच्या स्वार्थी खेळांमध्ये अडकलो आहोत".ज्याचा मोठा परिणाम आपल्या भविष्यावर होणार आहे. शेवती तो तरुण पिढीला आव्हान करतो, आता बदलासाठी तरुण पिढीने पुढे येण्याची गरज आहे.जर आपण आपला आवाज उठवला नाही तर कोण उठवणार? जर आपण हे राष्ट्र घडवले नाही तर कोण घडवणार? आपण अंधाराला जाळून टाकणारी आग आहोत. आपण अन्यायाला वाहून नेणारे वादळ आहोत, असे म्हणतो.