चला मुंबईत परिवर्तन घडवूया; येत्या १६ सप्टेंबरला भाजपचा 'विजय संकल्प मेळावा' ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार

10 Sep 2025 16:25:35

मुंबई : चला मुंबईत परिवर्तन घडवूया, या शीर्षकासह येत्या १६ सप्टेंबर रोजी भाजपचा विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात हा विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे समजते.

वरळीतील एनएससीआय डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे भाजपचा विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, १६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा मेळावा पार पडणार आहे. मोदीजींचे व्हिजन आणि देवेंद्रजींचे मार्गदर्शन या घोषणेसह या विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अमित साटम यांनी मुंबई अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भाजपचा हा पहिलाच मोठा मेळावा असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.




Powered By Sangraha 9.0