मध्य रेल्वेकडून १०० कोटींचा दंड वसूल ; १७.१९ लाख प्रकरणांत विनातिकीट प्रवाशांना दंड

10 Sep 2025 21:27:04

मुंबई, मध्य रेल्वेने अनधिकृत आणि विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी कारवाई अधिक कठोर केली आहे. वर्षभर राबविलेल्या जोरदार आणि नियमित तिकीट तपासणी मोहिमांद्वारे मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ दरम्यान लक्षणीय दंड वसूल केला. विनातिकीट प्रवास करणाऱ्या १७.१९ लाख प्रवाशांना ताब्यात घेतले आणि विक्रमी दंड रु.१००.५० कोटी वसूल केला.

ऑगस्ट २०२५ महिन्यात, मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी टीमने २.७६ लाख प्रवाशांना विनातिकीट/वैध तिकीटाशिवाय प्रवास करताना ताब्यात घेतले, जे ऑगस्ट २०२४ मधील २.३४ लाख प्रवाशांशी तुलना करता १८% वाढ दर्शवते. ऑगस्ट २०२५ मध्ये विनातिकीट/वैध तिकीटाशिवाय प्रवास करणाऱ्यांकडून रु.१३.७८ कोटी दंड वसूल केला गेला, तर ऑगस्ट २०२४ मध्ये या दंडाची रक्कम रु८.८५ कोटी होती, यामुळे ५५% पेक्षा जास्त वाढ दिसून येते.

वर्षभरातील कारवाई ची आकडेवारी

• भुसावळ विभागात ४.३४ लाख प्रकरणांमधून ३६.९३ कोटी रुपये,

• मुंबई विभागात ७.०३ लाख प्रकरणांमधून २९.१७ कोटी रुपये,

• नागपूर विभागात १.८५ लाख प्रकरणांमधून ११.४४ कोटी रुपये

• पुणे विभागात १.८९ लाख प्रकरणांमधून १०.४१ कोटी रुपये

• सोलापूर विभागात १.०४ लाख प्रकरणांमधून ५.०१ कोटी रुपये आणि

• मुख्यालयात १.०४ लाख प्रकरणांमधून ७.५४ कोटी रुपये

Powered By Sangraha 9.0