नागपूर: रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रादेशिक तिबेटीयन महिला संघ आणि भारत-तिबेट सहकार्य मंचाच्या भगिनींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना राखी बांधली. राष्ट्र सेविका समिती, महल परिसरातील तसेच दिशा ३० च्या भगिनींनीही राखी बांधून शुभेच्छा दिल्या. यावेळी तिबेटचे सेटलमेंट ऑफिसर तेन्झिन त्संगपा यांनी सरसंघचालकांना "व्हॉइस फॉर द व्हॉइसलेस, बाय हिज होलिनेस द १४ वे दलाई लामा" हे पुस्तक भेट म्हणून दिले. तसेच प्रादेशिक तिबेटियन महिला संघटना आणि भारत-तिब्बत सहयोग चळवळीद्वारे भगवान गौतम बुद्धांचा थांगका सादर करण्यात आला.