लंडन , जगाच्या पाठीवर सातत्याने अपमान झेलणार्या पाकिस्तानला, अजून एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान खाली घालावी लागली आहे. पाकिस्तानचा युवा फलांदाज हैदर अली याला बलात्काराच्या आरोपाखाली लंडनमध्ये अटक झाली आहे.
पाकिस्तानच्या युवा संघाच्या इग्लंड दौर्यादरम्यान ही घटना घडली. एका मुलीने हैदरवर बलात्काराचे आरोप केल्यानंतर, लंडन पोलिसांनी चौकशीनंतर हैदर अलीला अटक केली. पाकिस्तान क्रिकेट मंडळानेदेखील चौकशी पूर्ण होईपर्यंत हैदर अलीचे अनिश्चित काळासाठी निलंबन केले आहे.