लव्ह जिहाद विरोधात उजैनमध्ये भरली हिंदूंची महासभा!

09 Aug 2025 17:35:41

मुंबई : मध्य प्रदेशाच्या उज्जैन येथील खाचरोद भागात काही दिवसांपूर्वी एका २० वर्षांच्या हिंदू युवतीला सादिक नावाच्या जिहादीने फूस लावून पळवून नेले. या घटनेच्या निषेधार्थ हिंदूंची महासभा भरल्याचे दिसून आले. यात शहर आणि गावांमधून आलेल्या सुमारे ६ हजारांहून अधिक हिंदूंनी लव्ह जिहाद विरोधात संघटन शक्ती दाखवून दिली.

महासभेत संतांनी हिंदूंना आवाहन केले की, सध्याच्या काळात हिंदू समाज विभाजित आहे. हिंदू समाजाने एकत्र यायला हवे. इतिहास साक्ष आहे की जेव्हा-जेव्हा हिंदू जागा झाला, तेव्हा-तेव्हा विधर्मी पळाला. सनातन समाजाचा संताप अनावर झाला तर, संतांना माळेऐवजी भाला (शस्त्र) उचलण्यास भाग पाडले जाईल." महासभेस हिंदू पंचायतचे संत आनंदगिरीजी महाराज, नरेंद्र गिरीजी महाराज, हिंदू जागरण मंचाचे नेपाळ सिंह डोडिया आदी मान्यवर उपस्थित होते.

महासभा सुरू होण्यापूर्वी विशाल हिंदू एकता रॅली पार पडली. रॅलीत महिला-पुरुष हातात फलक घेऊन चालताना दिसत होते. या रॅलीत ६ हजारांहून अधिक लोक सहभागी झाले. रॅलीचे नियोजन सुरळीत ठेवण्यासाठी मोठा पोलिसबंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Powered By Sangraha 9.0