स्पेनच्या जुमिलामध्ये सार्वजनिक ठिकाणी इस्लामिक सण साजरे करण्यास बंदी! स्थानिक परिषदेद्वारे प्रस्ताव मंजूर

09 Aug 2025 18:41:05

मुंबई : युरोपमध्ये सध्या स्थलांतरितांविरुद्धची लाट असून काही राष्ट्रांमध्ये इस्लाम विरुद्ध तीव्र निदर्शने होताना दिसतायत. अशातच स्पेनच्या मुर्सिया प्रदेशातील जुमिला येथे स्थानिक परिषदेने नागरी केंद्रे आणि क्रीडा सभागृहांसारख्या सार्वजनिक ठिकाणी 'ईद-उल-फित्र' आणि 'ईद-उल-अजहा' सारखे सण-उत्सव साजरे करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

अशी माहिती आहे की, स्पेनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून स्थलांतरितांद्वारे मुलींना छेडछाड करण्याच्या किंवा इतर स्वरूपाच्या हिंसाचाराच्या घटना घडत आहेत आणि त्यामुळे स्पेनमधील राष्ट्रवादी पक्षांनी "स्पेन हा ख्रिस्ती लोकांचा देश आहे" अशा घोषणा द्यायला सुरुवात केली आहे. स्पेन एकेकाळी मुस्लिमांच्या अधिपत्याखाली होता, परंतु त्यानंतर लवकरच स्पेनने मुस्लिम सत्तेला उलथवून टाकले. जुमिला देखील काही काळ मुस्लिमांनी जिंकलेलं होतं, मात्र त्यांनीही नंतर ही गुलामी झुगारून दिली. आणि आता जुमिला येथे सार्वजनिकरित्या इस्लामिक सण साजरे करता येणार नाहीत, असा प्रस्ताव मंजूर झाला आहे. यावरून डाव्या विचारसरणीचे आणि इस्लामी नेते नाराज झाले असून, ते इस्लामोफोबियाची चर्चा करत आहेत.

युरोपातील इस्लामीकरणावर लिहिणाऱ्या एमी मेक यांनी लिहिलं की, "इस्लामिक कायद्यानुसार एकदा एखाद्या ठिकाणी त्यांचा अधिकार प्रस्थापित झाला, की तो त्यांच्या मते कायमस्वरूपी होतो, म्हणूनच ते रागात आहेत." डाव्या विचारांचे लोक या बंदीला उलथवण्याची योजना आखत आहेत. पण आत्ता तरी स्पेनने एक स्पष्ट संदेश दिला आहे की आम्ही तुमच्या विस्तारवादी अजेंडामध्ये अडकणार नाही. टोमी रॉबिन्सनने एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये एक कृष्णवर्णीय पुरुष एका गोऱ्या स्पॅनिश महिलेला मारहाण करत असून तिला लुटत असल्याचे दिसते.

जुमिलामधील या निर्णयाकडे सांस्कृतिक परंपरा जपण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिले जातेय. काही लोक म्हणतात की मुस्लिम समाज त्यांच्या सणांमधून त्यांची संख्या आणि ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतो. रस्त्यावर नमाज पठण करून ते दाखवतात की आता ते इतक्या मोठ्या संख्येने आहेत की त्यांना काहीही विशेषाधिकार मिळू शकतात. आणि मग काही ठिकाणी ते स्थानिक लोकांना त्यांचे सण साजरेही करू देत नाहीत, असेही काही जणांचे म्हणणे आहे. काही लोकांनी सोशल मीडियावर लिहिले की जुमिलामध्ये योग्य निर्णय घेण्यात आला आहे.

हा प्रस्ताव जुमिला येथे पीपल्स पार्टीने सादर केला होता आणि राष्ट्रवादी वोक्स पक्ष अनुपस्थित असतानाही तो पास झाला. डाव्या पक्षांनी या प्रस्तावाचा विरोध केला होता. वोक्स पक्षाने नंतर एक्सवर आनंद व्यक्त करत लिहिले की, आमच्या पाठिंब्यामुळेच हा प्रस्ताव मंजूर झाला.
Powered By Sangraha 9.0