मुंबईत परदेशी वन्यजीवांच्या तस्करीचे सत्र सुरूच; ५४ प्राण्यांची तस्करी उघड

09 Aug 2025 18:51:37
exotic wildlife

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई विमानतळावरुन शनिवार दि. ९ आॅगस्ट रोजी परदेशी वन्यजीवांची तस्करी उघडकीस आणण्यात आली (exotic wildlife). बॅंकाॅकवरुन आलेल्या भारतीय प्रवाशाकडे ५४ प्राणी आढळले (exotic wildlife). विमान कंपनीला या प्राण्यांना पुन्हा बॅंकाॅकला पाठवण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. (exotic wildlife)
 
 
शनिवार बॅंकाॅकवरुन मुंबई विमानतळावर उतरलेल्या इंडिगोच्या विमानात काही परदेशी प्राणी आढळून आले. या विमानातून प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाशाच्या बॅगेची तपासणी केल्यावर सीमाशुल्क विभागाला त्यामध्ये काही प्राणी आढळले. अल्बिनो रेड इयर्ड स्लायडर टर्टल, मार्मोसेट आणि कस्कस हे प्राणी बॅगेमध्ये आढळून आले. सीमाशुल्क विभागाने याप्रकरणाची माहिती केंद्रीय वन्यजीव संरक्षण गुन्हे विभागाला (डब्लूसीसीबी) दिली. त्यांच्याकडून राॅ या संस्थेला या प्राण्यांच्या तात्पुरत्या देखभालीसाठी पाचारण करण्यात आले. त्यानंतर वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ आणि सायटीच्या तरतुदींनुसार डब्लूसीसीबीने या प्राण्यांना बँकॉकला परत पाठवण्यासाठी तात्काळ आदेश जारी केले आहेत.
 
 
'कनव्हेन्शन आॅन इंटरनॅशनल ट्रेड इन एनडेन्जर्ड स्पिसीज आॅफ वाईल्ड फौना अॅण्ड फ्लोरा' म्हणजेच 'सायटीस' या वन्यजीव संरक्षणासाठी असलेल्या आंतरराष्ट्रीय नियमनाअंतर्गत तस्करी होणाऱ्या परदेशी वन्यजीवांना संरक्षण देण्यात आले आहे. या नियमानाअंतर्गत समाविष्ट असणाऱ्या प्राण्यांना भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत चौथ्या श्रेणीत संरक्षण देण्यात आले आहे. म्हणजेच त्यांची वाहतूक करणे वा खरेदी-विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे.
Powered By Sangraha 9.0