क्राॅफर्ड मार्केटवर वन विभागाची धाड; २२६ वन्यजीव जप्त

09 Aug 2025 21:39:31
wildlife seized from crawford market


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
ठाणे वन्यजीव वन विभागाने मुंबईतील क्राॅफर्ड मार्केट परिसरात धाड टाकून शुक्रवार दि. ८ आॅगस्ट रोजी २२६ वन्यजीवांना ताब्यात घेण्यात आले (wildlife seized from crawford market). यामध्ये भारतीय पोपट आणि कासवांच्या अनेक जातींचा समावेश आहे (wildlife seized from crawford market). आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (wildlife seized from crawford market)
 
 
क्राॅफर्ड मार्केट परिसर हा प्राणी विक्रीसाठी ओळखला जातो. पूर्वी याठिकाणी मोठ्या संख्येने भारतीय वन्यजीवांची विक्री होत असे. दरम्यानच्या काळात ही विक्री काही अंशी थांबली होती. मात्र, पुन्हा एकदा क्राॅफर्ड मार्केटमधील भारतीय वन्यजीवांच्या विक्रीने डोके वर काढल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवार वन विभागाने वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन क्राॅफर्ड मार्केट परिसरातील एका गोदामावर धाड मारली. या धाडीत वनकर्मचाऱ्यांना १० अलेक्झांड्रिन पोपट, १११ रिंक नोंद पोपट (११ मृत),६७ इंडियन स्टार कासव, १० इंडियन टेंट कासव, १६ इंडियन रुफ कासव, १० इंडियन आय कासव आणि १ इंडियन साॅफ्टशेल कासव जप्त केले. या कारवाईतून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
 
 
ही कारवाई ठाणे वन्यजीव विभाग, केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण मंडळ, गस्ती पथक ठाणे, गस्ती पथक वाड आणि भालीवली आणि वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव मुंबई यांनी वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या मदतीने केली. जप्त करण्यात आलेले सर्व प्राणी आणि पक्षी हे सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून त्यांची वैद्यकीय तपासणी आणि काळजी घेण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0