घरोघरी तिरंगा अभियाना अंतर्गत शिक्षण विभागाअंतर्गत अनेकविध उपक्रमांचे आयोजन

07 Aug 2025 16:20:39

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आपला देश, आपला तिरंगा या बाबतची माहिती अधिक वृध्दिंगत करण्याच्या दृष्टीकोनातून प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. याला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

युवा पिढीमध्ये व शालेय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र प्रेमाची भावना प्रज्वलित करण्याच्या दृष्टीकोनातून शासनाच्या निर्देशानुसार घरोघरी तिरंगा या अभियाना अंतर्गत महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव, शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागामार्फत अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने नुकताच महापालिका क्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आपला देश, आपला तिरंगा या बाबतची माहिती अधिक वृध्दिंगत करण्याच्या दृष्टीकोनातून प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थी व विद्यार्थींनीनी या प्रश्नमंजुषेत हिरिरीने सहभाग घेतला आणि शिक्षक वर्गाने सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांची समाधन कारक उत्तरे दिली. तसेच शिक्षण विभागामार्फत तिरंगा रंगाच्या रंगावली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अनेक चित्ताकर्षक रांगोळ्या साकारल्यामुळे शाळा- शांळामधील वातावरण देश प्रेमाने भारुन गेले होते.
Powered By Sangraha 9.0